किंग्स्टन : पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिलाच बळी  हा चेतेश्वर पुजाराचा मिळवणे, हे आत्मविश्वास उंचावणारे आहे, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने व्यक्त केली. कसोटी क्रिकेटमधील वजनदार व्यक्तिमत्त्वाच्या २६ वर्षीय कॉर्नवॉलने आपल्या तिसऱ्या षटकात पुजाराला बाद केले. पहिल्या दिवसाच्या खेळाबाबत कॉर्नवॉल म्हणाला, ‘‘आमच्या वेगवान गोलंदाजांनी दिमाखदार कामगिरी बजावली. माझ्याकडे जेव्हा चेंडू देण्यात आला, तेव्हा मीसुद्धा जबाबदारीने गोलंदाजी केली.’’

Story img Loader