पहिल्या विश्वविजयाने भारताला नवी दिशा दिली, असे मत विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषक विजयाला ३० वर्षे पूर्ण झाल्याप्रसंगी सांगितले. ‘‘मला वाटते की, १९८३ च्या विश्वविजयाने भारताला नवी दिशा दिली आणि भारतातील क्रीडा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यावेळी एका युवा खेळाडूंची फळी माझ्याबरोबर होती. आम्ही तिथे क्रिकेटचा आनंद लुटायला गेलो होतो. वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात पराभूत केल्यावर आमचा हुरूप वाढला आणि अंतिम फेरी आम्ही जिद्दीच्या जोरावर जिंकली,’’ असे कपिल म्हणाले.
या विषयी भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर म्हणाले की, विश्वविजय हा क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता. लॉर्ड्सवर जनसमुदायापुढे विश्वचषक उंचावला आणि अंगावर शहारे आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First world cup victory given the new direction to india kapil