वीरेंद्र सेहवाग म्हणजे स्फोटक फलंदाज. तो जेव्हा मैदानावर यायचा तेव्हा कर्णधाराने आपल्याला गोलंदाजी देऊ नये, असे प्रत्येक गोलंदाजांना वाटायचे. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून सेहवाग मैदानावर वावरायचा. त्याची फलंदाजी जितकी स्फोटक असायची, तो मात्र तितकाच शांत असायचा. त्याचा हाच शांत आणि मिस्कील स्वभाव निवृत्तीनंतर साऱ्यांना पाहायला मिळाला आणि सेहवागने केलेले ट्विट्स हा चर्चेचा विषय बनला. २०१८ हे वर्ष अनेक कारणांसाठी गाजलं. त्यात सेहवागने केलेले खास ट्विट हे विशेष आकर्षण ठरलं. त्यामुळे ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी २०१८ या वर्षातील सेहवागचे निवडक १० ट्विट्स…

१. सेहवागचा धुम्रपानाविरोधी संदेश वाचून नेटकऱ्यांना हसू अनावर

 

२. ‘रनमशीन’ विराटला सेहवागने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

३. सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांबाबतचं ट्विट भाव खाऊन गेलं

 




४. स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाआधी सेहवागने ‘समस्त पतिदेवांची’ व्यथा मांडली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी लग्नगाठीच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या. सेहवागचा हा अंदाज सगळ्यांना आवडला.

 



५. शिक्षण मंडळच गृहपाठ करायला विसरले, तर विद्यार्थ्यांचे कसे होणार? या सेहवागच्या उपहासात्मक टीकेने चांगलीच वाहवा मिळवली.

 

६. भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधाराची जन्मतारीख काय असेल? हे सेहवागने मजेशीर पद्धतीने सांगितले होते.

 

७. सेहवागने शोधून काढला ‘मेसीचा काका’; इंस्टाग्रामवरील पोस्टवर त्याने या माणसाला ‘मेसी का चाचा’ संबोधलं

 

८. पक्ष्यांचा फोटो पोस्ट करून सेहवागने मजेशीर पद्धतीने त्यातला नर पक्षी (जोडप्यातील पती) सहज ओळखला होता.

 

९. शिखर धवनला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

 

१०. भारताच्या स्वातंत्र्यदिनी सेहवागने केलेले ट्विट विशेष चर्चेत राहिले.

 

Story img Loader