२०१९ या वर्षाची अखेर भारतीय क्रिकेट संघाने विजयाने केली. आपल्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी हे वर्ष चांगलं गेलं, विश्वचषकातील ५ शतकं, कसोटी संघात पुनरागमन करताना झळकावलेलं द्विशतक यांच्यासह अनेक विक्रम रोहितने या वर्षात मोडले. या वर्षभरात रोहितने कोणते विक्रम मोडले, त्याचा घेतलेला आढावा….

दरम्यान, जानेवारी महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांची क्रिकेट मालिका खेळेल. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. श्रीलंकेविरुद्ध मालिकेत रोहितची भारतीय संघात निवड झालेली नसून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत रोहित खेळणार आहे. त्यामुळे आगामी वर्षात रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य पाहा – Flashback 2019 : जाणून घ्या भारताचे ‘हॅटट्रीकवीर’ गोलंदाज 

Story img Loader