Cricket Year Ender 2022: क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. अशा या लोकप्रिय क्रिकेट खेळाच्या विश्वाच्या दृष्टीने २०२२ वर्ष खूप महत्वपूर्ण ठरले. क्रिकेट विश्वात २०२२ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक पार पडला. ज्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन झाले. त्याचबरोबर या वर्षी काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या चाहत्यांना निराश देखील केली आहे. त्यामुळे आज आपण २०२२ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

१.बेन स्टोक्स –

अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा प्रमुख खेळाडू आहे. स्टोक्सने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. त्याने इंस्टाग्रामवर याबाबात एक माहिती दिली होती. त्याने कसोटी आणि टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला. तो वनडे क्रिकेमधून निवृत्त झाला आहे. बेन स्टोक्स मंगळवारी (19 जुलै) शेवटचा सामना त्याच्या घरच्या मैदान डरहमवर खेळला आहे. स्टोक्सने इंग्लंडसाठी १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये तो ‘सामनावीर’ म्हणून निवडला गेला होता.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

२. मोहम्मद हाफिज –

मोहम्मद हाफिज हा पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याने तब्बल १८ वर्षे पाकिस्तान संघासाठी योगदान दिले. त्याने सोशल मीडियावर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हाफिजने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हाफिजने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि २१ शतके आणि ६४ अर्धशतकांच्या मदतीने १२७८० धावा केल्या. तसेच त्याच्या नावावर २५३ विकेट्स आहेत.

३.रॉस टेलर –

रॉस टेलर हा न्यूझीलंडकडून खेळलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. १६ वर्षे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याने ४ एप्रिल २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टेलरचा शेवटचा सामना हॅमिल्टनमध्ये नेदरलँड्सविरुद्ध झाला होता. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे. त्याने ४५० सामन्यांमध्ये किवींचे प्रतिनिधित्व केले, जो न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विक्रम आहे. त्याने न्यूझीलंडसाठी १८,१९९ धावा केल्या, ज्या कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. त्याने १ मार्च २००६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

४.ख्रिस मॉरिस –

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने यावर्षी जानेवारीत सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. या क्रिकेटपटूने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ख्रिस मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी ६९ सामने खेळले आणि तीन अर्धशतकांसह ७७३ धावा केल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत ९४ विकेट्स घेतल्या आहेत.

५. किरॉन पोलार्ड –

किरॉन पोलार्डने गेल्या महिन्यात आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. जेव्हा त्याने हा निर्णय घेतला, तेव्हा तो वेस्ट इंडिजचा कर्णधार होता. पोलार्डने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंट जॉर्ज येथे पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने २२४ सामने खेळले असून तीन शतके आणि १९ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ४२७५ धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही तो खूप उपयुक्त ठरला आणि त्याने ९७ बळी घेतल्या आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा देखील कारनामा केला आहे.

हेही वाचा – IPL Auction 2023: संजय मांजरेकरांची मोठी भविष्यवाणी; ‘या’ दोन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स पाडणार पैशांचा पाऊस

६. इऑन मॉर्गन –

इऑन मॉर्गनने या वर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयर्लंडकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा मॉर्गन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मॉर्गनने २००६ ते २०२२ दरम्यान इंग्लिश संघासाठी एकूण ३७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १०८५९ धावा निघाल्या. १२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७६ विजयांसह तो इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील होता.

७. मिताली राज –

मिताली राजने ८ जूनला सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या निवृत्तीबद्दल माहिती दिली होती. २६ जून १९९ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजने २७ मार्च २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला. यादरम्यान त्याने १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. मितालीने कसोटीत १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६९९ धावा केल्या. तर वनडेमध्ये ७ शतके आणि ६४ अर्धशतकांसह ७८०५ धावा जोडल्या. टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने १७ अर्धशतकांसह २३६४ धावा केल्या आहेत.

८.झुलन गोस्वामी –

भारतीय महिला संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने २० ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने कारकिर्दीतील शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. झूलन गोस्वामीने २० वर्षांच्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. या स्टार वेगवान गोलंदाजाने भारतासाठी १२ कसोटी, २०४ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत. तिने अनुक्रमे ४४, २५३ आणि ५६ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – Flashback 2022: फेडररच्या फेअरवेल सामना ते नीरज चोप्रा आणि मेस्सीचे सोनेरी यश, अशी ठरली यावर्षीच्या क्रीडा जगताची सफर

९. सुरेश रैना –

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केला आहे. सुरेश रैनाने ६ सप्टेंबरला ट्विटद्वारे याची घोषणा केली होती. सुरेश रैनाच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १०९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६८७१ धावा केल्या. ज्यात १४ शतके आहेत. आणि सर्वोत्तम धावसंख्या २०४ नाबाद होती.

१०. रॉबिन उथप्पा –

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा याने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच नाही तर क्लब क्रिकेटलाही अलविदा केला आहे. त्याने हा निर्णय १४ सप्टेंबरला घेतला. तो आयसीसी टी-२० विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने आता सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उथप्पाने भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्‍याने ६ अर्धशतकांसह वनडेमध्‍ये ९३४ धावा केल्या. तर टी-२० मध्ये त्याने १ अर्धशतकासह २४९ धावा केल्या होत्या.