Sports Year Ender 2022: २०२२ हे वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे. हे वर्ष क्रीडा जगतासाठी अनेक गोड गोड आठवणी घेऊन आले. टेनिस दिग्गज रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली, तर नीरज चोप्राने डायमंड लीगचे सुवर्णपदक जिंकून भारतीयांना अभिमान वाटला. यानंतर लिओनेल मेस्सीने आपल्या संघाला विश्वविजेता बनवले आणि अर्जेंटिनासह मेस्सीचे चाहते आजही जल्लोषात मग्न आहेत. येथे आम्ही या वर्षातील क्रीडा विश्वातील मोठ्या घटनांबद्दल सांगत आहोत.

तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वविजेता ठरला अर्जेंटिना

अर्जेंटिनाच्या संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले आणि अंतिम फेरीत दोन गोल करत अर्जेंटिनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फिफा विश्वचषकाच्या प्रत्येक बाद फेरीत गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला. अंतिम सामन्यात, अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला आणि तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. यासह फ्रान्सचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. मेस्सीने ट्रॉफी तसेच गोल्डन बॉलवर कब्जा केला आणि शेवटच्या विश्वचषकात विश्वविजेते होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

रॉजर फेडररने टेनिसमधून निवृत्ती घेतली

टेनिस इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या रॉजर फेडररने यावर्षी निवृत्ती जाहीर केली. राफेल नदालसोबत त्याने शेवटचा सामना खेळला आणि त्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण कारकिर्दीत फेडररचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला नदाल त्याच्या निरोपाच्या सामन्यात भावूक झाला होता आणि पराभवानंतर त्याला अश्रू आवरता आले नाहीत. फेडररने वयाच्या ४१ व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली. कारकिर्दीच्या अखेरीस तो दुखापतींशी झगडत होता.

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: बांगलादेशने जिंकली नाणेफेक, भारतीय संघात कुलदीप यादवच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने या वर्षी पुन्हा एकदा देशाचा गौरव केला. त्याने डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि असे करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८८.४४ मीटर होता. नीरजला यंदा दुखापतींशी झुंज दिली, पण मैदानात उतरल्यावर त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. या स्पर्धेत नीरजची सुरुवात चांगली झाली नाही, पण नंतर शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा: शाहीन आफ्रिदी चढणार बोहल्यावर! पाकिस्तानचा माजी विस्फोटक फलंदाजाचा होणार जावई, लग्नाची तारीख-ठिकाण जाहीर

कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेटचे ऑस्ट्रेलियाचे पहिले सुवर्ण

या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. टी२० फॉरमॅटमध्ये आयोजित या स्पर्धेत यजमान इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एका वेळी दोन विकेट्सवर 118 धावा करून विजयाच्या जवळ दिसत होते, पण शेवटी भारताने विकेट गमावल्या आणि सामना नऊ धावांनी गमावला.