India in Commonwealth Games 2022 Flashback: बर्मिंगहॅम येथे झालेल्या २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. २२ सुवर्ण पदकांसह तो पदकतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. भारतासाठी सर्वाधिक सुवर्णपदके कुस्तीमध्ये आली आहेत. एकूण पदकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारताने ६१ पदके जिंकून राष्ट्रकुल खेळांचा प्रवास संपवला. यावेळी भारताने कुस्तीमध्ये ६, वेटलिफ्टिंगमध्ये ४, लॉन बॉलमध्ये १, बॅडमिंटनमध्ये ३, बॉक्सिंगमध्ये ३, टेबल टेनिसमध्ये ४ आणि अॅथलेटिक्समध्ये १ सुवर्णपदक जिंकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले होते. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. यावेळी संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक मिळवले होते. तर, मीराबाई चानूने पहिले सुवर्णपदक पटकावले होते. हॉकीमधील रौप्यपदकाने भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता झाली होती.

२०१० मध्ये राष्ट्रकुलमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. ज्यामध्ये ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदकांसह एकूण १०१ पदके जिंकली. त्या वर्षी भारत पदकतालिकेत इंग्लंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक खेळांचा समावेश करण्यात आला नव्हता. शूटिंग, ग्रीको-रोमन कुस्ती, तिरंदाजी आणि टेनिस हे खेळ नव्हते. याशिवाय पॅरा (दिव्यांग) खेळाडूंनीही अनेक पदके जिंकली.

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: यावर्षीचा शेवट गोड करण्यासाठी टीम इंडियाला केवळ १४५ धावांची गरज, दुसऱ्या डावात बांगलादेश २३१ वर सर्वबाद

लवली चौबे, पिंकी, रूपा राणी तिर्की, आणि नयनमोनी सेकिया, यांनी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. या चौघांनीही कॉमनवेल्थ गेम्समध्ये लॉन बॉलमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले, तेही सुवर्णपदक! भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव केला. हा खेळ १९३० पासून खेळला जात आहे, तर भारतीय संघाने दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स (२०१०) पासून या खेळात भाग घेण्यास सुरुवात केली.

राष्ट्रकुल २०२२ मध्ये महिला क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. यामध्ये भारतीय महिला संघाने क्रिकेटमध्ये रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, येत्या काही वर्षांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत आणखी पदके जिंकेल या आशेने २०२२ चा निरोप घेतला.

भारताचे पदक विजेते खेळाडू

सुवर्ण पदक विजेते: मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (दिव्यांग खेळाडू), बजरंग पूनिया, साक्षी मलिक, दीपक पूनिया, रवि दहिया, विनेश फोगट, कुस्तीपटू नवीन, भाविना पटेल, नीतू घांगस, अमित पंघाल, एल्डहोस पॉल, निखत झरीन, शरथ कमल-श्रीजा अकुला, पीव्ही सिंधु, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज-चिराग शेट्टी, अचंता शरथ कमल

हेही वाचा: IPL 2023: कर्णधार म्हणून बेन स्टोक्सच्या रुपात सीएसकेला धोनीचा उत्तराधिकारी मिळाला का? सीईओ विश्वनाथ यांनी केला खुलासा

रौप्य पदक विजेते: संकेत सरगर, बिंदियारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकुर, भारतीय बॅडमिंटन संघ, तूलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला आबुबेकर, शरथ कमल- जी साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर अहलावत, पुरुष हॉकी संघ

कांस्य पदक विजेते: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरन, मोहित गरेवाल, जॅस्मिन लांबोरिया, पूजा गहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव घोषाल-दीपिका पल्लीकल, किदांबी श्रीकांत, त्रिषा जॉली-गायत्री गोपीचंद, जी साथियान

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback 2022 historic gold medal in lawn ball and silver in cricket for the first time in commonwealth games incomparable performance of wrestlers avw