Women Asia Cup 2022 Flashback: २०२२ हे वर्ष आता शेवटच्या वळणावर आले आहे. या वर्षी भारतासाठी क्रीडा क्षेत्रात अनेक विशेष संधी आल्या, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी जगभर आपला झेंडा फडकावला आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटसाठीही हे वर्ष खूप चांगले होते. भारतीय महिला क्रिकेट संघाने यावर्षी तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये काही ठिकाणी इतिहास रचला तर काही ठिकाणी निराशा पदरी आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच रौप्यपदक जिंकणे ऐतिहासिक ठरले –

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा सामना केला. ज्यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने हा सामना जिंकला नाही, पण मन नक्कीच जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघ निश्चितपणे अंतिम सामना हरला, पण तरीही प्रथमच महिला क्रिकेटमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना १६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १९.३ षटकात १५२ धावांवर सर्वबाद झाला.

भारतीय महिला संघाने विक्रमी सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले –

भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी करत आशिया कप २०२२ चे विजेतेपद पटकावले. सिल्हेत येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघाने विक्रमी सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे महिला आशिया चषकाचे आतापर्यंत केवळ ८ हंगाम झाले आहेत. म्हणजेच एक हंगाम सोडला, तर प्रत्येक वेळी भारतीय संघ चॅम्पियन ठरला आहे.

हेही वाचा – R Ashwin Record: अश्विनचा मोठा धमाका; भल्या-भल्यांना मागे टाकत ‘हा’ कारनामा करणारा, ठरला जगातील दुसराच खेळाडू

आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय महिला संघाची निराशा –

भारतीय महिला क्रिकेट संघ स्पर्धेच्या साखळी फेरीतून (महिला विश्वचषक २०२२) बाहेर पडला. त्यांनी सातपैकी तीन सामने जिंकले आणि चार गमावले. त्यामुळे संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन विकेट्सनी पराभूत झाल्याने बाहेर पडले. त्या सामन्यात दीप्ती शर्माचा नो बॉल भारतीय संघाला महागात पडला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback 2022 performance of indian cricket team in asia cup womens t20 world cup and odi world cup vbm