बॉलिवूडचा युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि सहकाऱ्यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. टिव्ही मालिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या सुशांतने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातही सुशांतने धोनीची भूमिका निभावली होती. एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीची भूमिका करण्यासाठी सुशांत काही दिवस धोनीसोबत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावेळी सुशांतने धोनीचे प्रत्येक बारकावे टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो धोनीला अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडायचा. चित्रपट प्रदर्शनादरम्यान प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुद्द सुशांतने हा प्रसंग सर्वांना सांगितला होता. “सुरुवातीच्या २-३ दिवसांमध्ये मी त्याला प्रश्न विचारले तेव्हा त्याने मला उत्तरं दिली. यानंतर मी सतत एकच प्रश्न विचारायला लागल्यामुळे धोनी वैतागला होता, मी पहिल्यांदा त्याला चिडताना पाहिलं. शेवटी धोनी मला म्हणाला, तू खूप प्रश्न विचारतोस…मी नंतर येतो.” नीरज पांडे दिग्दर्शीत एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीच्या लहानपणापासून ते भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धोनीने केला संघर्ष, त्याची लव्ह लाइफ या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या.

सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नैराश्यामुळे त्याने हे पाऊल उचललं असावं असा अंदाज मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि अभिनय क्षेत्रातील सर्व मान्यवर व्यक्तींनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.