अमेरिकन बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेव्हेदरला सोमवारी जागतिक बॉक्सिंग संघटनेकडून (डब्लूबीओ) जबरदस्त ठोसा बसला. दोन महिन्यांपूर्वी मॅन्नी पॅकिआओ याला नमवून जिंकलेले ‘वेल्टरवेट विश्वविजेतेपद’ डब्लूबीओने हिसकावून घेतले. पॅकिआओला नमवल्यानंतर डब्लूबीओ यांना देण्यात येणारी दोन लाख अमेरिकन डॉलरचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख चुकवल्यामुळे मेव्हेदरवर ही कारवाई करण्यात आली.
२ मे रोजी लास व्हेगास येथे पार पडलेल्या लढतीत मेव्हेदरने पॅकिआओला नमवून जवळपास २२ कोटी अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम जिंकली होती. डब्लूबीओच्या नियमानुसार बक्षीस रकमेच्या दोन टक्के रक्कम शुल्क म्हणून संघटनेला देणे लागते. त्यासाठी मेव्हेदरला शुक्रवापर्यंतची मुदत मिळाली होती, परंतु त्याने वेळेत शुल्क न भरल्याने डब्लूबीओने कारवाई केली. वेल्टरवेटसह मेव्हेदर सध्या डब्लूबीसी आणि डब्लूबीए कनिष्ठ मिडलवेट गटाचा विजेता आहे.
‘‘ डब्लूबीओ जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी दोन लाख अमेरिकन डॉलर शुल्क भरण्यात मेव्हेदर अपयशी ठरला. त्यानंतरही मेव्हेदर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला, परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला,’’अशी माहिती डब्लूबीओने आपल्या अधिकृत संकेतस्थळातून दिली आहे.
फ्लॉइड मेव्हेदरला जागतिक बॉक्सिंग संघटनेकडून ठोसा
अमेरिकन बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेव्हेदरला सोमवारी जागतिक बॉक्सिंग संघटनेकडून (डब्लूबीओ) जबरदस्त ठोसा बसला. दोन महिन्यांपूर्वी मॅन्नी पॅकिआओ याला नमवून जिंकलेले 'वेल्टरवेट विश्वविजेतेपद' डब्लूबीओने हिसकावून घेतले. पॅकिआओला नमवल्यानंतर डब्लूबीओ यांना देण्यात येणारी दोन लाख अमेरिकन डॉलरचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख चुकवल्यामुळे मेव्हेदरवर …
First published on: 08-07-2015 at 05:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Floyd mayweather stripped of his wbo world title