शतकातील सर्वात जास्त बक्षीस रक्कम असलेल्या लढतीत मॅन्नी पकिआओवर विजय साजरा करून सलग ४८ सामन्यांत अपराजित राहणाऱ्या अमेरिकेच्या बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेवेदरने १२ सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लढतीसाठी अँड्रे बेटरेला अव्हान दिले आहे. ही लढत जिंकून अमेरिकेचा दिग्गज बॉक्सिंगपटू रॉकी मार्सिआनोच्या ४९ विजयाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा त्याचा मानस आहे.
मे महिन्यात झालेल्या पकिआओविरुद्धच्या लढतीनंतर सप्टेंबरमध्ये आपण अखेरचा सामना खेळणार असल्याची घोषणा मेवेदरने केली होती. त्यानंतर या सामन्यासाठी तो कोणाला आव्हान देईल, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. याच दरम्यान कट्टर प्रतिस्पर्धी अमीर खानने मेवेदरला आव्हान दिले, परंतु त्याने ते धुडकावले. बुधवारी मेवेदरने अमेरिकेच्या बेर्टोविरुद्ध खेळणार असल्याची घोषणा केली. जागतिक बॉक्सिंग असोसिएशन (डब्लूबीए) आणि जागतिक बॉक्सिंग काउंसिलचे (डब्लूबीसी) जेतेपद पटकावणाऱ्या मेवेदरने दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या बेटरेला आव्हान देऊन वेल्टरवेटसमोर खडतर आव्हान उभे केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा