कारकीर्दीतील पाचशेव्या गोलची नोंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 रिअल माद्रिदचा सहज विजय

कारकीर्दीतील पाचशेव्या गोलची नोंद करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने रिअल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत माल्मोवर सहज विजय मिळवून दिला. रिअल माद्रिदने हा सामना २-० असा जिंकला. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या पंक्तीतील रौल याच्या विक्रमाची रोनाल्डोने बरोबरी केली.

गेल्या तीन सामन्यांत रोनाल्डोला गोल करण्यात अपयश आले होते. माल्मोविरुद्धच्या लढतीत मध्यंतराला काही मिनिटे असताना पाचशेवा गोल झळकावत रोनाल्डोने ‘गोलदुष्काळ’ संपवला. दुसऱ्या सत्रात आणखी एक गोल करत रोनाल्डोने रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या दोन गोलांसह रोनाल्डोच्या कारकीर्दीतील एकूण गोलांची संख्या ३२३ झाली आहे. स्पेन आणि रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान रौल गोन्झालेझ ब्लॅन्को यांच्या विक्रमाची रोनाल्डोने बरोबरी केली.

या विजयासह रिअलचे दोन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. पॅरिस सेंट जर्मेनने शाख्तर डोन्स्टकवर ३-० असा विजय मिळवला. मात्र दोन लढतीतील गोलफरकाच्या मुद्यावरही रिअलने सरशी साधली आहे. १९७९ साली युरोपियन चषकात उपविजेतेपद पटकावणाऱ्या माल्मो संघातर्फे कर्णधार मार्कुस रोसेनबर्ग आणि अँटन तिनरहोल्म यांनी सातत्याने गोलसाठी प्रयत्न करत रिअलचा गोलरक्षक केयलर नवासला दडपणाखाली ठेवले. इस्कोच्या हातून चेंडू निसटल्याचा फायदा उठवत रोनाल्डोने शानदार गोल केला. डॅनी काव्र्हाजलने लगेचच गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र क्रॉसबारला आदळून बाहेर गेला. माल्मोच्या योशिमार योटूनला ७८व्या मिनिटाला निलंबित करण्यात आले. यामुळे गोल करण्याच्या माल्मोच्या आशा मावळल्या. दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने आणखी एक गोल रिअलची आघाडी बळकट केली. उर्वरित वेळेत चेंडूवर नियंत्रण राखत रिअलने बाजी मारली.

मँचेस्टर सिटीच्या विजयात ऑग्युरो चमकला

सर्जिओ ऑग्युरोने ९०व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे केलेल्या गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने मोइनचेंनग्लॅडबॅच संघावर विजय साकारला. या पराभवामुळे ग्लॅडबॅच गुणतालिकेत तळाशी फेकला गेला आहे. ग्लॅडबॅचतर्फे लार्स स्टिंडलने गोल करत दमदार सुरुवात केली. प्रदीर्घ काळानंतरही बरोबरी करण्यात अपयश आल्याने सिटी संघावरील दडपण वाढले होते. मात्र ग्लॅडबॅचतर्फे आंद्रेस ख्रिस्तेनसेनच्या स्वयंगोलमुळे सिटीचे खाते उघडले. अतिरिक्त वेळेत ऑग्युरोने निर्णायक गोल करत सिटीला विजय मिळवून दिला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतल्या सलामीच्या लढतीत टॉटनहॅम हॉटस्पर संघाने सिटीचा ४-० असा धुव्वा उडवला होता. या पराभवातून सावरत सिटीने विजयी पुनरागमन केले.

मँचेस्टर युनायटेडचा संघर्षमय विजय

मँचेस्टर युनायटेला वोल्फ्सबर्ग संघाविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला. ज्युआन माटाच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर युनायटेडने वोल्फ्सबर्गवर २-१ अशी मात केली. सलामीच्या लढतीत यिंडहोव्हेन संघाने युनायटेडला २-१ असा पराभवाचा धक्का दिला होता. डॅनियल कॅलिगियुरीने वोल्फ्सबर्गला झटपट आघाडी मिळवून दिली. मात्र माटाने ३४व्या मिनिटाला गोल करत युनायटेडला बरोबरी करून दिली. त्यानंतर ख्रिस स्माइलिंगला सुरेख पास दिला. स्माइलिंगने गोल करत युनायटेडला आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळात बचाव अभेद्य करत युनायटेडने विजय मिळवला.