रॉय हॉजसन यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने मत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात नॉर्वेवर १-० असा विजय मिळवला. इंग्लंडचा कर्णधार वेन रूनीने या सामन्यात ६८व्या मिनिटाला एकमेव गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. कारकिर्दीतील ४१वा गोल करीत रूनीने इंग्लंडच्याच मायकल ओव्हनचा सर्वाधिक गोलचा विक्रम मोडीत काढला आहे.
‘‘रूनीसाठी हा सामना फार मोठा होता आणि यामध्ये त्याने कमाल केली. या सामन्यात त्याच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी होती. या जबाबदारीबरोबरच त्याने चांगला खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. पण रूनी यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकतो आणि संघाला यापेक्षाही चांगले विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे हॉजसन यांनी सांगितले.

Story img Loader