फुटबॉलविश्वाला काळिमा फासणाऱ्या फिफा महाघोटाळ्यात सहभाग नसल्याचा दावा लॅटिन अमेरिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. होंडुरास फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष राफेल कॅलेजस आणि फिफाचे उपाध्यक्ष तसेच दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष ज्युआन अँगेल नॅपाऊट यांच्यावर महाघोटाळ्यात सहभागही असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी या दोघांची न्यूयॉर्क न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी दोषमुक्त असल्याचा दावा या दोघांनी केला. या प्रकरणात एकूण ३९ व्यक्ती आणि दोन कंपन्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
५७ वर्षीय नॅपाऊट यांना फिफाचा महाघोटाळा उघडकीला आला त्याच स्वित्र्झलडमधील पंचतारांकित हॉटेलातून अन्य एका धाडीत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना अमेरिकेत आणण्यात आले. त्यांच्यावर लाच स्वीकारणे आणि पैशाचा अपहार असे गंभीर गुन्हे आहेत. नॅपाऊट याणि कॅलेजस या दोघांवरही फिफाने ९० दिवसांची बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा