मागील वर्ष सर्वोत्कृष्ट खेळ करणारा अर्जेंटीनाचा स्ट्राइकर लियोनेल मेसीने विक्रम करत सलग ‘फिफा’चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला आहे.
मेसीने या शर्यतीत बार्सीलोनाचा आपलेच सहयोगी आंद्रेस इनिएस्ता आणि रीयाल मैड्रिडच्या क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मागे टाकले.
मेसीला ४१.६० टक्के मते मिळली तर रोनाल्डोला २३.६८ आणि इनिएस्ताला १०.९१ टक्के मते पडली.
मेसी आणि फ्रांसच्या मायकल प्लातिनी हे फक्त दोन खेळाडू सलग तीन वेळा हा पुरस्कार जिंकले आहेत. हॉलंडच्या जोहान क्रफ आणि मार्को वान बास्टेन यांना तीन वेळा हा पुरस्कार मिळाला आहे.
स्पेनच्या विंसेंट डेल बोस्कला २०१२ मध्ये सर्वश्रेष्ठ प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले. त्यांनी रीयाल माद्रीदच्या जोस मोरिन्हो आणि बार्सीलोनाचे माजी प्रशिक्षक जोसेफ गार्डियोला यांना मागे टाकले.
मेसीसाठी हे वर्ष खूपच लाभदायक ठरले, त्यांने २५ गोल केले. त्यांनी एका वार्षिक कॅलेंडर वर्षात सर्वाधिक गोलचा गर्ड मूलर यांचा ४० वर्ष जूना विक्रमही मोडित काढला आहे.
मेसीने मागील वर्षातील प्रत्येत स्पर्धैतील मिळून एकूण ९१ गोल केले आहेत. मेसीने म्हटले, ‘‘पुन्हा एकदा पुरस्कार जिंकून चांगले वाटले. प्रत्येक पुरस्कार खास आहे. आपल्याला पुरस्कार मिळेल असा विचार करून कोणी येथे येत नाही.’
मेसी म्हणाला, ‘मी हा पुरस्कार बार्सीलोनाच्या माझ्या सहयोगींना विशेष करून आंद्रेसबरोबर वाटू इच्छितो.’’ मला त्याच्यासोबत खेळायला मिळाले हा मी माझा गौरव मानतो. मी अर्जेंटीना संघाच्या खेळाडूंचाही उल्लेख करू इच्छितो. माझ्यासाठी ज्यांनी मतदान केले, त्या सर्व कर्णधार आणि प्रशिक्षकांचाही मी आभारी आहे, असं तो पुढे म्हणाला.
फुटबॉल पंडितांचे असे म्हणणे आहे की, जोपर्यंत तो अर्जेंटीनासाठी मोठी कामगिरी करत नाही, त्याची तुलना पेले किंवा डिएगो माराडोनासोबत होणार नाही.
फेयरप्ले पुरस्कार उजबेकिस्तान फुटबॉल महासंघाला मिळाला. तर फिफा अध्यक्षचा एक विशेष पुरस्कार जर्मनीचे महान खेळाड़ू फ्रेंज बैकनबाउर यांना दिला गेला.
मेसीने पटकावला चौंथ्यांदा ‘फिफा’चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार
मागील वर्ष सर्वोत्कृष्ट खेळ करणारा अर्जेंटीनाचा स्ट्राइकर लियोनेल मेसीने विक्रम करत सलग 'फिफा'चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला आहे. मेसीने या शर्यतीत बार्सीलोनाचा आपलेच सहयोगी आंद्रेस इनिएस्ता आणि रीयाल मैड्रिडच्या क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मागे टाकले.
First published on: 08-01-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football messi wins record fourth ballon dor