Sunil Chhetri Better Than Messi & Ronaldo: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच सॅफ चॅम्पियनशिप जिंकली आहे. बंगळुरू येथे झालेल्या SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. भारताने नवव्यांदा सॅफ स्पर्धा जिंकली. यापूर्वी भारतीय संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषकही जिंकला होता. दोन्ही स्पर्धांमध्ये ३८ वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर कॅप्टन छेत्रीने मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या देशासाठी तो मेस्सी आणि रोनाल्डोलाही हरवू शकतो, असे त्याने म्हटले आहे.

माझ्या देशासाठी मेस्सी-रोनाल्डोलाही पराभूत करेल – सुनील छेत्री

न्यूज१८ या वृत्तवाहिनीशी बोलताना भारतीय फुटबॉल संघाचा सुनील छेत्री म्हणाला, “जेव्हा माझ्या भारत देशासाठी माझे सर्वोत्तम देण्याचा विचार येतो तेव्हा मी मेस्सी आणि रोनाल्डोला मागे टाकू शकतो. ते कितीही मोठे खेळाडू असू देत त्यांना देखील पराभूत करेल.” याशिवाय त्याच्या वाढत्या वयाबद्दल सुनीलने सांगितले की, “त्याला आता बरे वाटत आहे. अजून काही दिवस मी खेळणार आहे”, असेही तो म्हणाला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा: MS Dhoni: न्यू लुकमध्ये एम.एस. धोनी चेन्नईत दाखल; विमानतळावर ‘थाला’च्या स्वागतासाठी चाहत्यांनी केला फुलांचा वर्षाव, Video व्हायरल

सुनीलने सांगितले की, “ज्या दिवशी त्याला आतून खेळावेसे वाटणार नाही त्या दिवशी तो खेळणे बंद करेल.” सुनील पुढे म्हणाला, “मला वाटते की अजून माझ्यामध्ये खूप फुटबॉल आहे आणि मी देशासाठी चांगले काम करण्यास प्रेरित आहे. ज्या दिवशी मला वाटेल की मानसिकरित्या थकलो आहे त्या दिवशी मी निघून जाईन पण हे कधी होईल माहीत नाही.” ३८ वर्षीय खेळाडू भारतीय फुटबॉल संघाकडून मिळालेला पाठिंबा, कौतुक आणि प्रोत्साहन नम्रपणे स्वीकारतो. भारतीय फुटबॉलबद्दल चाहत्यांच्या मनातील उत्साहवर्धक बदलाबाबत तो खूप आनंदी आहे. छेत्रीने संघ आणि समर्थक दोघांनीही त्यांची सचोटी आणि सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केली.

छेत्री पुढे म्हणाला, “मॅच पाहण्यासाठी चाहत्यांना कधीच अडचण आली नाही, पण हो, फुटबॉलबद्दल बोलू लागलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे, मला वाटते की हे खरोखर चांगले आहे. मला जाणवते की फुटबॉलप्रती देशात वातावरण बदलत आहे. पण त्याच वेळी मला माहित आहे की जरी आपण फार मोठी झेप घेतली असली तरी आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आपल्याला फक्त चांगले काम करत राहायचे आहे, आपल्याला आता कुठे जायचे आहे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.”

हेही वाचा: IND vs WI: भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा, १४० किलो वजनाच्या ‘या’ खेळाडूला मिळाले स्थान

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणतो की, “आगामी आशियाई चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे संघाचे लक्ष्य असेल. आशियाई चषक हा आमच्यासाठी विश्वचषकासारखा आहे. तो आमच्या यादीत सर्वात वरचा आहे आणि त्यामुळे आमची सर्वोत्तम कामगिरी करणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. खेळाडूंवर दबाव आणण्याचा माझा हेतू नाही, पण आपण ते करायला हवे. आम्ही प्रत्येक वेळी आशियाई कपसाठी पात्र ठरतो.” तो म्हणाला, “सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल असा आहे की, काय होईल हे कोणालाच माहीत नाही, आणि अंडरडॉग संघ सुद्धा जिंकू शकतात! फुटबॉलमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे, आणि हा संदेश आमच्या संघाला पाठवत आहे,”

सुनील छेत्रीची कारकीर्द अशी आहे

भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने आतापर्यंत १४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने ९३ गोल केले आहेत. पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यानंतर तो तिसरा सक्रिय गोल करणारा खेळाडू आहे. सर्वकालीन गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत छेत्री जरी चौथ्या क्रमांकावर असला तरी इराणचा अली १०९ गोलांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत रोनाल्डो १२३ गोलांसह पहिल्या आणि मेस्सी १०३ गोलांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Story img Loader