कतार येथे होणार असलेल्या २०२२ फुटबॉल विश्वचषकाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात फिफाकडून विलंब होण्याची चिन्हे आहेत. मध्य आशिया विभागात होणाऱ्या या स्पर्धेचे ठिकाण आणि तारखा बदलण्यासंबंधी उलटसुलट चर्चाना उधाण आले आहेत. यासंदर्भात उद्भवलेल्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी फिफा विशेष समितीची नियुक्ती करणार आहे. विश्वचषकाच्या तारखा पुढे ढकलण्यासंबंधी विशेष कार्यकारिणी समिती विचार करत असल्याची माहिती फिफाचे उपाध्यक्ष जिम बॉयस यांनी स्पष्ट केले. मात्र हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची घाई होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कतारमध्ये अतिशय उष्ण वातावरणात कार्यरत स्थलांतरित व्यक्तींच्या हलाखीच्या स्थितीविषयीचे वृत्त माध्यमांनी दिले होते. २०२२ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धाही याच काळात होणार असल्याने दोन्ही प्रतिष्ठेचे क्रीडा सोहळे एकाचवेळी होणार असल्याची काळजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष थॉमस बॅच यांनी व्यक्त केली होती. मात्र हे टाळण्यासाठी स्पर्धा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फिफातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा