ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना विश्वास
बोस्टन मॅरेथॉनच्या वेळी झालेला हल्ला दुर्दैवी आहे. आम्ही या हल्ल्याच्या तपासाचा कसून अभ्यास करत आहोत. मात्र या घटनेमुळे पुढील वर्षी होणारा फुटबॉल विश्वचषक तसेच २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकला कोणताही धोका नसल्याचे ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र बोस्टन हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर २०१४ विश्वचषकासाठी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था लागू करणार असल्याचे फिफाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. फिफाचे महासचिव जेरोम व्ॉलके यांनी हैतीला भेट दिली. विश्वचषकादरम्यान खाजगी सुरक्षा व्यवस्था, पोलीस अधिकारी, लष्कर तसेच इंटरपोल अशी व्यवस्था तैनात करणार असल्याचे व्ॉलके यांनी स्पष्ट केले.
ब्राझीलमधील सर्व स्टेडियम्सची पाहणी सुरू असून, प्रत्येक मैदानाला द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या शेवटच्या विश्वचषकाप्रमाणे सॅटेलाइटद्वारे स्टेडियमवर नजर ठेवण्यात येणार आहे. बोस्टन येथील घटनेमुळे यंत्रणा अधिक सतर्क होणे आवश्यक आहे. समुद्रकिनारे, विमानतळ, स्टेडियम या सगळ्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे.
विश्वचषकात सहभागी होणाऱ्या ३२ देशांमधील सुरक्षा यंत्रणांची मदत घेण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून व्ॉलके यांनी हैतीला भेट दिली. ब्राझीलमध्ये अद्याप तरी दहशतवादी हल्ला झालेला नाही. मात्र मोठय़ा क्रीडा स्पर्धादरम्यान हल्ला करणे सोपे असल्याचे बोस्टनच्या निमित्ताने स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा