चॅम्पियन लीग टेनिस स्पर्धेत सर्वोत्तम खेळासह जेतेपद पटकावणे हे उद्दिष्ट असेलच, मात्र त्याहीपेक्षा ते मैत्रीपर्व असेल, असे मत भारताचा अव्वल टेनिसपटू लिएण्डर पेसने व्यक्त केले. या स्पर्धेच्या माध्यमातून नवे मित्र मिळतील, स्नेहबंध निर्माण होईल, ते जास्त महत्त्वाचे आहे, असे त्याने पुढे सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘या स्पर्धेचे स्वरूप अनोखे आहे. एरवी आमचे सामने वैयक्तिक पातळीवर होतात. मात्र या स्पर्धेत पुरुष तसेच महिला असा एकत्रित आमचा संघ असणार आहे. आम्हाला संघासाठी खेळायचे आहे’.

Story img Loader