बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. असा यशस्वी, गुणी कलाकार अचानक आपल्यातून निघून जाईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. आज यश त्याच्या पायाशी लोळण घेत असताना सुशांतने आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुशांत उत्तम अभिनेता तर होताच पण एखादी भूमिका जिवंत करण्यासाठी तो प्रचंड मेहनत घ्यायचा. भूमिकेचा खोलात जाऊन अभ्यास करायचा. त्यानंतर पडद्यावर तो ती व्यक्तीरेखा साकारायचा. सुशांतने अनेक चित्रपट केले पण आजही तो आठवतो ते, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मधल्या धोनीच्या रोलसाठी.

क्रिकेट हा भारतीयांचा जिव्हाळयाचा विषय आहे. त्यात ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये त्याची मुख्य भूमिका होती. धोनीची मैदानावरची देहबोली, लकब, हालचाल, हेलिकॉप्टर शॉट हे सर्व साकारणे सोपे नव्हते. पण सुशांतने प्रचंड मेहनत घेऊन हे सर्व आत्मसात केले व पडद्यावर हुबेहूब तसा धोनी साकारला. त्यामुळे सुशांतला त्या रोलसाठी कायम लक्षात ठेवले जाईल.

पडद्यावर एम.एस.धोनीचा रोल साकारण्यासाठी सुशांतला स्वत: धोनीने प्रशिक्षित केले नव्हते. धोनीच्या या रोलसाठी भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी त्याच्याकडून तयारी करुन घेतली होती. सुशांतने किरण मोरेंसोबत अनेक महिने खडतर सराव केला होता. “किरण मोरे सरांसोबत मी १३ महिने सराव केला. ते खूप कठोर परिश्रम करुन घेतात. अभिनेत्यासारखी नाही एका व्यावसायिक क्रिकेटपटूसारखीच तुम्हाला त्यांच्याकडे ट्रेनिंग मिळते” असे सुशांतने सांगितले होते. डेली एक्सेलसियरने हे वृत्त दिले होते. धोनीचा रोल साकारताना आपण कुठे कमी पडू नये, यासाठी दिवसाचे चार ते पाच तास तो किरण मोरेंसोबत मैदानावर घाम गाळायचा.