रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. कर्णधार म्हणून रोहितचं ते पाचवं विजेतेपद ठरलं. दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागल्यानंतरही रोहितने दमदार पुनरागमन करत अंतिम सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली होती रोहितचे बालपणाचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एका मुलाखतीत रोहितबाबत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

दिनेश लाड म्हणाले, रोहित नेहमी जिंकण्याचा विचार करतो. खेळ म्हणजे त्याच्यासाठी पक्त जिंकणे आहे. एकदा एका टीम सोबत खेळतांना समोरच्या टीमच्या स्कोर २४० होता. त्याचा पाठलाग करतांना आमचा स्कोर ३० धावांवर ४ बाद असा होता. मात्र त्यावेळी रोहित शर्मा खेळत होतो. त्याने माझ्यासाठी मेसेज पाठवला की, सरांना सांगा टेन्शन घेवू नका. ही मॅच मी जिंकून देणार. त्यावेळी रोहितने १०० धावा काढल्या होत्या.

हेही वाचा- रोहित शर्माच्या यशाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले पाहिजे; प्रशिक्षक दिनेश लाड यांचा खुलासा

रोहितच्या डोक्यात एकचं गोष्ट असते की त्याला जिंकायचे आहे. खेळ म्हणजे फक्त जिंकणे एवढाचं विचार तो करतो. जिंकले तरचं खेळात मजा येते. आपण हारलो तर उदास होतो. जर जिंकण्यासाठी आपण खेळलात तर आपण चांगली खेळी खेळू शकता. हा फंडा रोहितचा सुरुवातीपासून होता, असे प्रशिक्षक दिनेश लाड सांगतात.

Story img Loader