R.P. Singh on Shubman Gill Form: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० सामना शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज सध्या २-१ ने पुढे आहे. भारतासाठी सलामीच्या जोडीचे अपयश चिंतेचा विषय आहे. विशेषत: शुबमन गिलचे फॉर्मात नसणे आणि अपेक्षित धावा न करणे ही सर्वात त्रासदायक गोष्ट आहे. माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंगने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सलग दोन पराभवानंतर भारताने तिसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळाडू चौथ्या सामन्यातही हेच यश कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. युवा फलंदाज तिलक वर्मा याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याचवेळी सलामीवीर शुबमन गिलच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. याबाबत माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आर.पी.सिंग म्हणाला, “मला वाटते की भारतीय संघाला शुबमन गिलची काळजी वाटत असेल, कारण तो बऱ्याच दिवसांपासून मोठी धावसंख्या करू शकलेला नाही.”

MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Umpire Anil Chaudhary Statement on Pakistan Mohammed Rizwan Appeals in Matches
VIDEO: “कबुतरासारखा उड्या मारत असतो…” पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारतीय अंपायरचं मोठं विधान, सर्व विकेटकिपर्सनाही दिली सक्त ताकीद
Wasim Jaffer on Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…
Rohit Sharma react on bat selection process
Rohit Sharma : “मी ‘हे’ करत नाही पण संघातील खेळाडू…”, रोहित शर्माने सांगितलं ड्रेसिंग रुममधलं गुपित, बॅट निवडीवर म्हणाला…
ICC Test Ranking Updates Indian Players Ravindra Jadeja and R Ashwin Table Topper
ICC Test Rankings: ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचा दबदबा, अश्विन-जडेजा पहिल्या स्थानी तर रोहित-विराट…
Manu Bhaker Statement on Bond with Coach Jaspal Rana
Manu Bhaker: ‘ते कदाचित माझ्या कानशिलात लगावतील…’, मनू भाकेर कोच जसपाल राणा यांच्याबद्दल असं का म्हणाली?
Sunil Gavaskar Statement on Virat Kohli And Rohit Sharma For Not Playing Duleep Trophy
Sunil Gavaskar: “जेव्हा तिशी पार केलेला खेळाडू…”, विराट-रोहितच्या दुलीप ट्रॉफी न खेळण्यावर सुनील गावसकर संतापले, BCCI ला पण सुनावलं

हेही वाचा: IND vs WI: लिओनेल मेस्सी ते पंजाबी नातेवाईक; USAमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंच्या मनात येणारी ‘ही’ आहे पहिली गोष्ट, पाहा Video

आर.पी. सिंह शुबमन गिलच्या फॉर्मवर बोलला

जिओ सिनेमाच्या क्रिकेट पॅनेलवर असलेला आर.पी. सिंह म्हणाला, “जर शुबमन गिल लवकर फॉर्मात आला नाही तर टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा असेल. संघात बऱ्याचवेळा संधी देण्यात आली आहे तरीदेखील त्याला डाव्या हाताच्या फिरकीपटूंविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही. खेळपट्ट्या किंचित आव्हानात्मक आहेत यात शंका नाही, परंतु जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असाल, तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्याना सामोरे जावे लागतेच.

पुढे माजी खेळाडू म्हणाला की, “कायम तुम्हाला एकसमान असलेल्या भारतीय खेळपट्ट्या मिळणार नाही, जिथे तुम्हाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळेल, परंतु मला वाटते की भारतीय संघाने निर्णय घेतला आहे. भविष्यात शुबमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. जरी असे असले तरी आगामी आशिया कप आणि विश्वचषकाच्या दृष्टीने त्याला धावा करणे गरजेचे आहे”

हेही वाचा: Kane Williamson: न्यूझीलंडला मोठा धक्का! आगामी विश्वचषकातून केन विलियम्सन होऊ शकतो बाहेर, फिटनेसबाबत आली अपडेट

तिसऱ्या सामन्यात यशस्वीला संधी मिळाली

वेस्ट इंडिज दौऱ्यावर शुबमन गिलची बॅट शांत होती त्याचा फॉर्म हा गायब झालेला दिसत होता. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर टी२० मध्येही त्याने फारशा धावा केल्या नाहीत. तिसऱ्या टी२० सामन्यात त्याच्या जागी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला. तो देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. चौथ्या टी२० मध्ये शुबमन गिलला संघात स्थान मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडियाला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने आजचा सामना गमावला तर टीम इंडिया मालिका देखील गमावले.