फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत २३ देशांतील विविध खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.

सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत अव्वल स्थानी असून, त्याची कमाई तब्बल ८ कोटी ८० लाख अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. यातील ५ कोटी ६० लाख अमेरिकी डॉलर्स रोनाल्डोचे मानधन आहे, तर ३ कोटी २० लाख अमेरिकी डॉलर तो जाहिरातींच्या माध्यमातून कमावत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेसी यादीत दुसऱया स्थानावर असून, त्याची कमाई ८ कोटी १० लाख अमेरिकी डॉलरच्या घरात आहे. तिसऱया स्थानावर बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स, तर चौथ्या स्थानावर टेनिसपटू रॉजर फेडरर आहे.

Story img Loader