भारताची परदेशी प्रशिक्षक किम जि ह्य़ून यांनी सुचवलेल्या बदलांमुळे खेळ उंचावला, असे मत विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

‘‘किम यांनी माझ्या खेळाचा अभ्यास करून अनेक बदल सुचवले. पी. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना या बदलांचा माझ्या कौशल्यावर सकारात्मक परिणाम झाला,’’ असे सिंधूने सांगितले. सहारा इंडिया परिवारातर्फे रविवारी मुंबईत एका शानदार कार्यक्रमात तिला गौरवण्यात आले.

Story img Loader