कोची : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या छोटेखानी खेळाडू लिलावात बेन स्टोक्स, सॅम करन आणि कॅमरून ग्रीन यांसारख्या परदेशी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी १० संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. या लिलावात ३० विदेशी खेळाडूंसह एकूण ८७ स्थानांसाठी ४०५ क्रिकेटपटूंवर बोली लावण्यात येईल.

‘आयपीएल’ लिलावाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लावण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सने २०२१मध्ये त्याला १६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. यंदाचा लिलाव छोटेखानी असल्याने दहाही संघांकडे मर्यादित रक्कम शिल्लक आहे. असे असले तरी मॉरिसवरील बोलीचा विक्रम मोडला जातो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या

यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या इंग्लंडच्या सॅम करनवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. २४ वर्षीय करनला पंजाब किंग्जने २०१९मध्ये चांगल्या किमतीत संघात घेतले होते. यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. चेन्नईचा पुन्हा करनला खरेदी करण्याचा प्रयत्न असेल. पाठीच्या दुखापतीमुळे २०२२च्या हंगामात सहभागी न झालेल्या करनची मूळ किंमत दोन कोटी आहे.

करनशिवाय इंग्लंडचा कसोटी कर्णधार स्टोक्स आणि लयीत असलेला फलंदाज हॅरी ब्रूकवरही चांगली बोली लागू शकते. ब्रूकने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान दौऱ्यातील तीनही कसोटी सामन्यांत शतक झळकावले. स्टोक्सची मूळ किंमत दोन कोटी रुपये असून ब्रूकची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवरही सर्वाच्या नजरा असतील. त्याने वर्षांच्या सुरुवातीला भारतात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान सलामीला येताना चमकदार कामगिरी केली होती. लिलावातील मोठय़ा नावांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचाही समावेश आहे. त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे.

’ वेळ : दुपारी २.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, फस्र्ट, जिओ सिनेमा

भारतीय खेळाडूंमध्ये मयांकवर नजर

भारतीय खेळाडूंमध्ये सलामीवीर मयांक अगरवालवर मोठी बोली लागू शकते. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये आहे. मयांकने गेल्या हंगामात पंजाब किंग्ज नेतृत्व केले होते. मात्र, त्याला कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही अपयश आले. त्यामुळे पंजाबने त्याला संघमुक्त केले होते. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि जयदेव उनाडकट हे अनुभवी वेगवान गोलंदाजही लिलावात उपलब्ध असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या (अनकॅप्ड) भारतीय खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि यश ठाकूर यांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जने संघमुक्त केलेला फलंदाज एन. जगदीसनने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत सलग पाच शतके झळाकवली. त्यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहण्यास मिळू शकेल.

 संघ                शिल्लक रक्कम         खेळाडूंच्या रिक्त जागा

 सनरायजर्स हैदराबाद     ४२.२५ कोटी                 १३

 कोलकाता नाइट रायडर्स ७.०५ कोटी                  ११    

 लखनऊ सुपर जायंट्स  २३.३५ कोटी                  १०

 मुंबई इंडियन्स        २०.५५ कोटी                  ९

 पंजाब किंग्ज           ३२.२ कोटी                   ९

 राजस्थान रॉयल्स      १३.२ कोटी                   ९

 चेन्नई सुपर किंग्ज     २०.४५ कोटी                  ७

 गुजरात जायंट्स         १९.२५ कोटी                 ७

 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु   ८.७५ कोटी               ७

 दिल्ली कॅपिटल्स        १९.४५ कोटी                  ५