ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. पेन आगामी अ‍ॅशेस मालिकेत यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही. अलीकडेच, पेनने एका महिलेला आपले अश्लील फोटो आणि संदेश पाठवले होते. यानंतर त्याने खेद व्यक्त करत कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियन संघात सामील होण्यापूर्वी पेन मार्श कपमध्ये तस्मानियाकडून खेळणार होता. मात्र ३७ वर्षीय पेनने शुक्रवारी सकाळीच आपले नाव मागे घेतले.

पेनच्या जागी मॅथ्यू वेड, अॅलेक्स कॅरी आणि जोश इंग्लिश यांपैकी एकाला ऑस्ट्रेलियन संघात संधी मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात वेडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यष्टीरक्षक म्हणून जोश इंग्लिस हा महान ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची पहिली पसंती आहे. वॉर्न म्हणतो की तो 360 डिग्रीचा खेळाडू आहे आणि त्याने गेल्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – …म्हणून २०१७ पासून श्रेयस अय्यरच्या वडिलांनी बदलला नव्हता त्यांचा हा WhatsApp DP

कमिन्स कर्णधार

जगातील अव्वल कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ६५ वर्षात पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कमिन्सने टिम पेनची जागा घेतली आहे.

Story img Loader