प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आरोन समर्सबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोन समर्सला लहान मुलांचे पोर्नोग्राफिक फोटो आणि व्हिज्युअल सामग्री बाळगल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले आहे. समर्स गेल्या अनेक महिन्यांपासून या कारवायांमध्ये सामील होता, ज्यामुळे त्याला ४ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्याला किमान २ वर्षांसाठी पॅरोलवर बाहेर येण्याची परवानगी दिली जाणार नाही. होबार्ट हरिकेन्ससाठी बिग बॅश लीग २०१७-१८ मध्ये खेळलेला समर्स इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट अॅप्सद्वारे १६ वर्षाखालील मुलांशी संपर्क साधायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिपोर्टनुसार, आरोन समर्सकडे मुलांचे ८० फोटो सापडले आहेत, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉन बर्न्स म्हणाले, ”समर्सने या मुलांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने हे फोटो ठेवले होते.” समर्सच्या वकिलांनी कोर्टाला त्याची शिक्षा कमी करण्याची विनंती केली होती, मात्र कोर्टाने त्याचे म्हणणे न ऐकता समर्सला तुरुंगात पाठवले.

हेही वाचा – १४ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण : ‘त्या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूवर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘‘अशा गोष्टी…”

समर्स मे महिन्यात तुरुंगात गेला होता आणि आता पुढील दोन वर्षे तुरुंगात राहणार आहे. समर्सने होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर तस्मानियासाठी जेएलटी वनडे कप खेळताना १९ सप्टेंबर २०१८ रोजी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. समर्स २०२०-२१ पाकिस्तान कपमध्ये दक्षिण पंजाबकडून खेळण्यासाठी आला होता. त्याने पाकिस्तान सुपर लीगमधील कराची किंग्ज या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former australian cricketer aaron summers jailed for possessing sexually explicit images of children adn