Michael Clarke On Rohit Sharma: टीम इंडियाला गेल्या १० वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्याने कोट्यवधी भारतीयांचे मन पुन्हा एकदा दु:खी झाले. या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या कर्णधारपदावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, एका माजी क्रिकेटपटूने रोहितबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजयी होण्यात अयशस्वी ठरली. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मालाही टीकेला सामोरे जावे लागले. त्यातच या सामन्यात रविचंद्रन अश्विनला न खेळवण्याच्या त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल क्लार्कने रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठं वक्तव्य केलं आहे. फायनल हरल्यामुळे रोहितला “वाईट कर्णधार म्हणणे चुकीचे ठरेल”, असे क्लार्कचे मत आहे.

Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
Prithvi Shaw Post
Prithvi Shaw Post : “देवा, आणखी मी काय करू?”, मुंबई संघातून डच्चू मिळाल्यानंतर पृथ्वी शॉचे हताश उद्गार
Rajat Patidar Protest 3rd Umpire Blunder Then Re reversed The Decision and Third Umpire Apologises
SMAT 2024: रजत पाटीदार तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर वैतागला, मैदान सोडण्यास दिला नकार; माफी मागत पंचांनी बदलला निर्णय
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

हेही वाचा: World Cup 2023: “पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळेच…”, वर्ल्डकपच्या वेळपत्रकावरून BCCIने PCBला चांगलेच खडसावले

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ही आयसीसी ट्रॉफी गमावली

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची २०२२ आशिया कप जिंकण्याची संधी हुकली. यानंतर २०२२ मध्येच आयसीसी टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या २०२३ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. रोहित शर्माची फलंदाजीही चांगली चाललेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याची बॅट शांत होती. अशा परिस्थितीत आता त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘या’ दिग्गजाने कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्क रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल म्हणाला, “मी रोहितवर विश्वास ठेवीन. तो खूप चांगला कर्णधार आहे. त्याचा आक्रमक दृष्टिकोन पहा, तो सकारात्मक दिसतो आणि त्याने मुंबई इंडियन्सला भरपूर यश मिळवून दिले आहे. केवळ भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकू शकला नाही, याचा अर्थ असा नाही की भारताचे नेतृत्व करण्यासाठी रोहित योग्य व्यक्ती नाही. एक फायनल हरली म्हणून तो खराब होत नाही.”

हेही वाचा: PCB Chairman: BCCIला धमकी देणाऱ्या नजम सेठींची खुर्ची धोक्यात! आशिया कप आधीच होणार गच्छंती

आगामी मालिकेत संधी मिळणार नाही?

टीम इंडियाचे सर्व खेळाडू सध्या सुट्टी साजरी करत आहेत. यानंतर संघाला १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळायचे आहे. यानंतर टीम इंडियाला वर्षाच्या अखेरीपर्यंत सलग सामने खेळावे लागतील, ज्यामध्ये आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धांचाही समावेश आहे. वृत्तानुसार, रोहित शर्माला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही.

Story img Loader