Shane Warne’s Death Caused by Covid Vaccine: ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नच्या मृत्यूने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचे कारण कोरोनाची लस असू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. खरेतर, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने घेतलेल्या कोविड लसीमुळे हृदयाशी संबंधित आजार वाढतात, असे या अहवालात समोर आले आहे. वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.
विशेष म्हणजे शेन वॉर्नला थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मृत्यूच्या सुमारे नऊ महिने आधी त्यांने कोरोनाची लस घेतली होती. वॉर्नने घेतलेली कोरोना लस हृदयाशी संबंधित आजार वाढवते, असे या अहवालात समोर आले आहे. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टने शेन वॉर्नच्या मृत्यूचे कारण कोरोनाची लस असू शकते असे म्हटले आहे.
शेन वॉर्नने कोविड एमआरएनए लस घेतली होती, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. वॉर्नला त्याच्या मृत्यूच्या सुमारे नऊ महिने आधी ही लस देण्यात आली होती. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा आणि डॉ. ख्रिस नील यांनी सांगितले की, कोविड एमआरएनए लसीमुळे कोरोनरी रोगाचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार आहे.
डॉक्टर मल्होत्रा म्हणाले, “माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्नला वयाच्या ५२ व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तथापि, सर्वांना माहित आहे की वॉर्नची जीवनशैली फारशी आरोग्यदायी नव्हती. तो धूम्रपान करायचा आणि त्याचे वजनही जास्त होते. अनेक रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये मुरुमासारखे काहीतरी दिसून आले आहे. फायझर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर माझ्या वडिलांचाही मृत्यू झाला होती. लसीनंतर त्यांचा हृदयविकार झपाट्याने वाढला होता.”
हेही वाचा – ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत मोठा बदल! मार्नस लाबुशेनला मागे टाकत ‘हा’ फलंदाज बनला नंबर वन
वॉर्न गेल्या वर्षी मार्चमध्ये थायलंडमधील त्याच्या हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडला होता. कोरोना लसीमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे शेन वॉर्नच्या स्थितीसारखीच असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. डॉ. मल्होत्रा म्हणाले, “या लसींचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी परिणाम खूप मोठे आहेत. मला यात काही शंका नाही की ऑस्ट्रेलियासह जगभरात आपण पाहत असलेल्या अतिरिक्त मृत्यूंमध्ये मोठे योगदान हे कोविड एमआरएनए लसींमुळे आहे. लोकांचे आणखी नुकसान आणि अनावश्यक मृत्यू टाळण्यासाठी जगभरात त्यांचा वापर थांबवण्याची तातडीची गरज आहे.”.”