वृत्तसंस्था, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या वर्षी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद अचानक सोडल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, असा खुलासा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने केला आहे.२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी कोहलीने या स्पर्धेनंतर आपण या प्रारूपातील भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघांसाठी एकच कर्णधार निवडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोहलीकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले आणि रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. ही बाब कोहलीला फारशी रुचली नव्हती. त्याने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. मात्र, त्याचा हा निर्णय तत्कालीन अध्यक्ष गांगुलीसह ‘बीसीसीआय’मधील सदस्यांना अपेक्षित नव्हता.
‘‘कोहली कसोटी संघाचे कर्णधारपद सोडेल असे ‘बीसीसीआय’मधील कोणालाही वाटले नव्हते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याने हा निर्णय घेतल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कोहलीने कर्णधारपद का सोडले, याचे उत्तर तोच देऊ शकेल. आता याबाबत चर्चा करून काहीच साध्य होणार नाही. निवड समितीला नव्या कर्णधाराची निवड करावी लागली आणि त्यावेळी रोहित सर्वोत्तम पर्याय होता,’’ असे गांगुलीने एका मुलाखतीत सांगितले.३६ वर्षीय रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
रहाणे, अश्विनचा पर्याय
रोहित आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून रोहितने विश्रांती मागितल्यास कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांचा विचार केला जाऊ शकतो.