भारतीय संघाने क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले. सध्याच्या क्रिकेट संघातही अनेक जण उत्तम प्रतीचा खेळ करताना दिसतात. पण भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारा माजी कर्णधार कपिल देव याने मात्र आपल्या मते महेंद्रसिंग धोनी हा सर्वोत्तम खेळाडू असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.

भारताने जगाला दिलेल्या खेळाडूंमध्ये धोनी हा भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. धोनीने भारताला २००७ साली टी२० विश्वचषक जिंकवून दिला. त्याच बरोबर २०११ साली त्याने भारताला विश्वचषक जिंकवून दिला. हे तर त्याने केलेच पण ९० कसोटी सामने खेळल्यावर धोनीने युवा खेळाडूंनी संधी मिळावी म्हणून निवृत्ती स्वीकारली. असे एखादा महान खेळाडूच करू शकतो, असे कपिल म्हणाला.

धोनी कधीही वैयक्तिक विक्रमांसाठी खेळला नाही. त्याचा नेहमी सामना जिंकवून देण्याकडे कल होता. कारण धोनीने कायम देशाला पहिले प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा धोनी हा सर्वोत्तम आहे, असे कपिल म्हणाला.

Story img Loader