ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क पुन्हा एकदा आपल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने कर्णधार म्हणून २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला होता. क्लार्कने पत्नी काइलीसोबत ७ वर्षांच्या लग्नानंतर २०१९ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांचा घटस्फोट ३०० कोटींमध्ये झाला होता, त्यामुळे या घटस्फोटाची खूप चर्चा झाली होती.
मात्र, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर क्लार्कचे जेड यारब्रॉसोबत नातेसंबंध जुळले होते. आता त्याच्यावर आपल्या गर्लफ्रेंडची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ज्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला उघडपणे अनेक चापट्या लगावल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बुधवारी रात्री मायकेल क्लार्क आणि जेड यारब्रॉ यांची सार्वजनिक उद्यानात हाणामारी झाली. यादरम्यान जेडने त्याच्यावर एक्स गर्लफ्रेंड पिप एडवर्ड्ससोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला आणि त्याला चापट्या मारण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, क्लार्क हे स्वीकारत नाहीये, तो आपल्या मुलीची शपथ घेत आहे. या वेळी क्लार्कला असे म्हणताना ऐकू येते की, मी शपथ घेतो, हे खरे नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेतो.
त्याच वेळी, ही संपूर्ण घटना डेली टेलिग्राफने पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये क्लार्क शर्टलेस दिसत आहे, तर त्याची गर्लफ्रेंड त्याच्यावर जोरात ओरडताना आणि त्याला चापट्या मारताना दिसत आहे.
दरम्यान, मायकल क्लार्कवर रिलेशनशिपमध्ये असूनही फसवणूक केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच घटना नाही. २०१८ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये क्लार्कचे त्याच्या असिस्टंटसोबत अफेअर असल्याची बातमी आली होती. त्यावेळी दोघांचे काही खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.