भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या निवृत्तीनंतर सरदारच्या नव्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. हॉकी इंडियाच्या 13 सदस्यीस निवड समितीत सरदार सिंहची नियुक्ती करण्यात आली आहे. सरदार सिंहनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
“होय, हे नवी काम मी स्विकारलं आहे. निवृत्तीनंतर भारतीय हॉकीच्या निवड समितीमध्ये काम करणं हे माझ्यासाठी एका प्रकारचं आव्हान आहे, आणि भारतीय हॉकीची सेवा करण्याची संधी मी कधीही सोडणार नाही. यातल्या अनेक सहकाऱ्यांसोबत मी खेळलो आहे, आता संघ निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होणं हे देखील माझ्यासाठी आव्हानच आहे.” सरदार सिंह पीटीआयशी बोलत होता.
अवश्य वाचा – स्पेन दौऱ्यासाठी राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचं नेतृत्व
2018 साली इंडोनेशियातील जकार्ता शहरात झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय हॉकीला अंतिम फेरी गाठता आली नाही. भारतीय हॉकी संघाच्या खराब कामगिरीमुळे काही कालावधीतच निराश झालेल्या सरदार सिंहने निवृत्तीचा मार्ग स्विकारला. 2020 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळण्याचा सरदारचा मानस होता. मात्र परदेशी प्रशिक्षकांसोबत झालेले वाद, व ढासळलेली कामगिरी यामुळे सरदारने निवृत्त होणं पसंत केलं.