नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धचा ‘आयपीएल’ सामना हा महेंद्रसिंह धोनीच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना होता असे मला वाटत नाही. तो पुढील हंगामातही खेळण्याची शक्यता कायम आहे. मात्र, त्यासाठी ‘बीसीसीआय’ने प्रभावी खेळाडूचा (इम्पॅक्ट प्लेयर) नियम कायम ठेवणेही गरजेचे आहे, असे मत धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघातील माजी सहकारी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘धोनीचा हा अखेरचा सामना होता असे मला वाटत नाही. त्याला अशाप्रकारे निरोप देणे आवडणार नाही,’’ असे रायडू म्हणाला. चेन्नईच्या संघाला शनिवारी बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ‘‘धोनी बाद झाल्यानंतर रागावलेला दिसला. हे धोनीच्या स्वभावाच्या अगदी विपरीत होते. चेन्नईच्या संघाला ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश मिळवून देत पुढे विजयी निरोप देण्याची धोनीची इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तो पुढील हंगामात खेळण्याची शक्यता कायम आहे,’’ असे रायडूने सांगितले.

‘‘प्रभावी खेळाडूच्या नियमामुळे चेन्नईला अतिरिक्त फलंदाज खेळवता येत आहे. त्यामुळे धोनीला केवळ अखेरची काही षटके फलंदाजी करुन मोठे फटके मारता येत आहेत. याच कारणास्तव ‘बीसीसीआय’ने प्रभावी खेळाडूचा नियम पुढील हंगामातही कायम राखला पाहिजे,’’ असेही रायडू म्हणाला.