पीटीआय, चेन्नई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संघाची ताकद वाढवण्यासाठी दुखापतीतून बरे होणाऱ्या खेळाडूंच्या पाठीमागे धावण्याची चूक आपण करू नये, असा इशारावजा सल्ला भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका चर्चासत्रात बोलताना दिला.
दुखापतीतून बरे होणारे खेळाडू चांगले अनुभवी आहेत यात शंका नाही. पण, ते किती दिवस खेळलेले नाहीत हे बघावे. त्यांच्या हालचालींवर परिणाम झालेला असतो हे स्वीकारायला हवे, हे आपले मत पटवून देताना शास्त्री यांनी जसप्रीत बुमराचे उदाहरण दिले. शास्त्री म्हणाले,‘‘बुमराच्या बाबतीत आपण ही चूक तीन वेळा केली. काय परिणाम झाला. गेले १४ महिने तो क्रिकेटपासून दूर आहे. तुम्ही खेळाडूंना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकता, पण त्यांना तंदुरुस्त करू शकत नाहीत. तंदुरुस्तीबाबत खेळाडूंना निर्णय घेण्यास द्यावे.’’
हाच संदर्भ घेत शास्त्री यांनी राहुलच्या होणाऱ्या संभाव्य निवडीवर निशाणा साधला. ‘‘राहुल चार महिने क्रिकेट खेळलेला नाही. गुडघ्याच्या दुखापतीतून तो बरा होत आहे, म्हणजे त्याच्या हालचालीदेखील मंदावलेल्या असतील. राहुलकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे, म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघत आहात. पण, तो त्या अपेक्षांना पूर्ण करेलच असे नाही,’’असेही शास्त्री म्हणाले.
भारतीय संघाची ताकद वाढवायची असेल, तर संघात तीन डावखुरे फलंदाज असायलाच हवेत असे सांगून शास्त्री यांनी तिलक वर्मा, रवींद्र जडेजा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या नावांना पसंती दिली. तिलक वर्माने आपल्याला प्रभावित केले असून, अलीकडच्या काळात तो चांगले क्रिकेट खेळत आहे. या पंक्तीत इशान किशनचाही विचार होऊ शकतो, असेही शास्त्री यांनी सांगितले.
डावखुऱ्या फलंदाजांवर विश्वास दाखवा. आघाडीच्या फळीत एक डावखुरा फलंदाज असायलाच हवा. उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज खेळपट्टीवर असताना गोलंदाज गोंधळून जातो. – रवी शास्त्री