भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या वांद्र्यात कांबळी यांनी दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला टक्कर मारली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र आता नंतर त्यांना जामीन मिळाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारदाराचं म्हणणं होतं की नशेत कांबळी यांनी आपल्या गाडीला टक्कर मारली आहे. यानंतर वांद्रा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. एएनआयच्या वृत्तानुसार, त्याने आपल्या सोसायटीच्या गेटलाही गाडी ठोकली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि नंतर जामीनही मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
emboldened rioters attacked police officer in nashik
पोलीस अधिकारीच असुरक्षित, उपनिरीक्षकावरील हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

विनोद कांबळी विरुद्ध कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३६ (स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे) आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वांद्रे पोलिसांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.