Former Indian Cricketer Ajay Jadeja: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजय जडेजा ५३ व्या वर्षी नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. जामनगरच्या राजघराण्याने शुक्रवारी अजय जडेजाला राजघराण्याच्या गादीचा वारसदार म्हणून जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार जामनगर राजघराण्याचे विद्यमान प्रमुख जाम साहब शत्रुसाल्यसिंहजी दिग्विजयसिंहजी यांनी अजय जडेजाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. शत्रुसाल्यसिंहजी दिग्विजयसिंहजी यावेळी म्हणाले की, अजयला उत्तराधिकारी घोषित करून मला आनंद वाटत आहे. तो जामनगरचा असून शाही कुटुंबाशी त्याचे संबंध आहेत. जामनगरची जनता माझ्यासारखेच त्यालाही आशीर्वाद आणि प्रेम देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५३ वर्षीय अजय जडेजाने भारतासाठी १५ कसोटी सामने आणि १९६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. जडेजाचा जन्म १९७१ मध्ये जामनगरमध्ये झाला होता. त्यावेळी याला नवानगर असे म्हटले जात होते. अजयचे वडील दौलतसिंहजी हे विद्यमान जाम साहब शत्रुसाल्यसिंहजी यांचे चुलत भाऊ आहेत.

हे वाचा >> IPL 2025 : ‘हार्दिकला रिलीज करुन ‘या’ तीन खेळाडूंना रिटेन करा…’; अजय जडेजाचा मुंबई इंडियन्सला सल्ला

शत्रुसाल्यसिंहजी यांनी पत्र लिहून केली घोषणा

शत्रुसाल्यसिंहजी यांनी पत्र लिहून ही घोषणा केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, पांडव ज्या दिवशी वनवास संपवून घरी परतले त्या दिवशी दसरा साजरा केला गेला, असे म्हटले जाते. या शूभ दिवसाच्या निमित्ताने मी अजय जडेजाला माझा उत्तराधिकारी नेमत आहे. त्यानेही हा प्रस्ताव स्वीकारला आहे. मला विश्वास आहे की, तो समर्पक भावनेने लोकांची सेवा करेल.”

जामनगरच्या महाराजांनी पत्रात काय म्हटले?

हे ही वाचा >> Ajay Jadeja: अजय जडेजाने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्याबाबत केले सूचक विधान; म्हणाला,“मी तयार…”

जामनगरच्या राजघराण्याचे क्रिकेटशी जुने संबंध आहेत. जामनगरचे महाराज रणजीतसिंहजी आणि दलीपसिंहजी हेही क्रिकेटशी संबंधित होते. यांच्याच नावाने रणजी आणि दलीप चषक खेळले जातात. विद्यमान जाम साहब शत्रुसाल्यसिंहजी यांना मुलबाळ नाही. त्यामुळे त्यांना उत्तराधिकारी नेमावा लागणार होता. शत्रुसाल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजयसिंह हे ३३ वर्ष जाम साहब होते. त्यांचे काका रणजीतसिंहजी यांनी दिग्विजयसिंह यांना दत्तक घेतले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer ajay jadeja appointed jamnagar royal family heir jam saheb gujarat softnews kvg