Akash Chopra has expressed his surprise that Umran Malik was not included in the India A team : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक तीन महिन्यांपूर्वी टीम इंडियासाठी खेळत होता, पण आता तो संघातून गायब आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या तीन संघांमध्येही त्याचे नाव नाही. निवड समितीनेही त्याला भारत अ संघासाठी योग्य मानले नाही. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि आकाश चोप्राने उमरानबाबत निवडकर्त्यांच्या उदासीन वृत्तीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. आकाश चोप्रा म्हणाला की, जसे लोक दुधातली माशी काढून बाहेर फेकतात, तसे उमरानला संघातून बाहेर फेकले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश चोप्राला एका व्यक्तीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर विचारले की उमरान मलिकचा टी-२० विश्वचषक संघात समावेश असावा का? यावर आकाश म्हणाला, “मला वाटतं त्याच्या नावाचा विचार व्हायला हवा. काही काळापूर्वी तुम्ही त्याला संघात ठेवले होते. वेस्ट इंडिज किंवा आयर्लंड दौऱ्यावर तुम्ही त्याला खेळवले होते. तेव्हापासून तो बाहेर आहे. तो दुधातल्या माशीसारखा बाहेर फेकला गेला. तुम्ही एखाद्याला संधी देता आणि मग अचानक त्याला बाहेर करता. जे माझ्या मते योग्य नाही.”

उमरान मलिक आपला शेवटचा सामना जुलैमध्ये खेळला –

२४ वर्षीय उमरान मलिकने या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. उमरानने १० एकदिवसीय सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत, तर आठ टी-२० सामन्यात त्याच्या नावावर ११ विकेट आहेत. उमरानला भविष्यातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हटले जाते. त्याच्या गोलंदाजीत वेग आहे, पण तरीही तो लाईन लेन्थपासून भटकताना दिसतो.

हेही वााचा – T20 World Cup : रोहित शर्मासोबत टी-२० विश्वचषकात ‘हा’ युवा खेळाडू सलामीला येईल, माजी खेळाडू आकाश चोप्राचे मत

उमरान मलिकला भारत अ संघासाठीही योग्य मानले नाही –

आकाश चोप्रा म्हणाला, “किमान उमरान मलिकला ‘स्कीम ऑफ थिंग्स’मध्ये ठेवायला हवे. त्याला भारत अ संघातही स्थान दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जो खेळाडू तीन महिन्यांपूर्वी टीम इंडियाचा भाग होता आणि आता तो भारत अ संघातही नाही, असे कसे होऊ शकते.” आकाश म्हणाला की, टी-२० संघात सामील होण्याचा प्रश्न आहे, त्याला अजून चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. उमरान मलिकने त्याच्या पदार्पणाच्या वनडेमध्ये न्यूझीलंडविरुद्ध २ विकेट घेतल्या, तर त्याच्या पदार्पणाच्या टी-२० सामन्यात त्याला आयर्लंडविरुद्ध एकही विकेट मिळवता आली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer akash chopra has expressed his surprise that umran malik was not included in the india a team vbm
First published on: 06-12-2023 at 15:04 IST