१९८० च्या दशकात क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फळंदाजीने क्रीडा विश्वात आपला ठसा उमटावणारे संजय मांजरेकर सध्या समालोचन करताना आपलं नाव कमावत आहेत. संयमी फलंदाजी करणारे मांजरेकर आक्रमक समालोचनसाठी ओळखले जातात. समालोजनशिवाय संजय मांजरेकर उत्तम गायकही आहेत, हे अनेकांना माहीत नसेल. त्यांनी रियाज करुन आपला गळाही कमालीचा गोड बनवला आहे. संजय मांजरेकर यांच्या गायकीचा अनुभव समालोचन कक्षात असणाऱ्या जोडीदारांना चांगलाच असेल. मात्र आपल्या चाहत्यांना प्रेक्षकांनाही त्यांच्या गायकीची झलक दिसली आहे. मांजरेकरांनी स्वत: एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातील “दिल दिया गल्ला…” हे गाणं गायलं आहे.

संजय मांजरेकर यांचा काही वर्षांपूर्वी एक अल्बमही आला होता. यामध्ये मांजरेकरने भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या आवडीची गाणी गायली होती.

Story img Loader