PCB complains to ICC against India: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) भारतात सुरू असलेल्या विश्वचषकासंदर्भात आयसीसीकडे तीन तक्रारी केल्या आहेत. पीसीबीने आपल्या तक्रारीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानी खेळाडूंसोबत केलेले गैरवर्तन, पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येऊ न देणे आणि भारताच्या व्हिसा धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तक्रारी केल्या आहेत. याबाबत भारतात नाराजी असून पाकिस्तानमध्येही याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे.
दानिश कनेरियाने खडसावले –
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने पीसीबीच्या या तक्रारीवर प्रश्न उपस्थित केला आहे. दानिश कनेरियाने एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, “पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बास यांना भारत आणि हिंदूंविरुद्ध टिप्पणी करण्यास कोणी सांगितले? मिकी आर्थरला आयसीसी इव्हेंटला बीसीसीआय इव्हेंट म्हणायला कोणी सांगितले? रिझवानला मैदानावर नमाज अदा करण्यास कोणी सांगितले? इतरांमध्ये दोष शोधणे बंद करा.”
झैनाबने हिंदू देवी-देवतांचा केला होता अपमान –
दानिश कनेरियाने पीसीबीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. झैनाब अब्बास ही पाकिस्तानी क्रीडा पत्रकार आहे आणि ती वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी भारतात आली होती, परंतु तिला भारतातून हद्दपार करण्यात आले होते. याचे कारण म्हणजे तिने हिंदू देवी-देवतांबद्दल खूप पूर्वी केलेले ट्विट जे व्हायरल होत होते.
हेही वाचा – World Cup 2023: खेळाडूंप्रमाणेच पंचांच्या कारकीर्दीची आकडेवारी पडद्यावर दाखवावी, डेव्हिड वॉर्नरने केली मागणी
मिकी आर्थरनेही केली वादग्रस्त टिप्पणी –
याशिवाय मिकी आर्थर पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, हा आयसीसीचा स्पर्धा नसून बीसीसीआयची स्पर्धा आहे. अहमदाबादमधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर मिकी आर्थरने हे वक्तव्य केले होते, ज्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. भारत-पाकिस्तान सामना हा पूर्णपणे बीसीसीआयची स्पर्धा असल्याचे मिकी आर्थरने म्हटले होते. हा कुठूनही आयसीसीची स्पर्धा वाटत नव्हती. मी स्टेडियममध्ये ‘दिल-दिल पाकिस्तान वारंवार’ ऐकले नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम सामन्याच्या निकालावर होतो.
मोहम्मद रिझवानने मैदानावर केली होती नमाज अदा –
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने नेदरलँडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानावर नमाज अदा केली होती. यासंदर्भात रिझवानविरुद्ध आयसीसीमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रिझवानने जे केले ते खेळाच्या विरोधात होते.