Three pythons enter Glenn McGrath’s house Video Viral: तीन वेळा विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंपैकी एक ग्लेन मॅकग्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. या व्हिडिओमध्ये तो अजगराला पकडताना दिसत आहे. ग्लेन मॅकग्राने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे.

ग्लेन मॅकग्राने इन्स्टाग्राम पोस्ट केलेल्या अलीकडील व्हिडीओमध्ये, तो त्याच्या घरी अजगराला पकडत असल्याचे दिसत आहे. त्याच्या घरात अजगर घुसल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ग्लेन मॅकग्रा त्याला घराबाहेर काढण्यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. यामुळे अजगराने त्याच्यावर अनेकवेळा हल्ला केला.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ –

शेवटी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राने विजय मिळवला. मॅकग्राने अजगराला पकडून जवळच्या झुडपात सोडले. त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना, त्याने लिहिले, “सारा लिओन मॅकग्राकडून भरपूर प्रोत्साहन आणि पाठिंब्यानंतर, घरातील सर्व ३ कोस्टल कार्पेट पायथन सुरक्षितपणे झुडपात परत सोडण्यात आले.”

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी खुशखबर, ‘या’ धडाकेबाज खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन

वेगवान गोलंदाजाने कॅन्सरविरुद्ध सुरू केलीय मोहीम –

मॅकग्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. ग्लेन मॅकग्रा मोठ्या खेळाडूंना बाद करण्यात माहीर होता. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टनला आऊट केले आहे. मॅकग्राची पहिली पत्नी जेन मॅकग्रा यांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. यानंतर या वेगवान गोलंदाजाने कॅन्सरविरुद्ध मोहीमही सुरू केली. जे आजतागायत चालू आहे.

हेही वाचा – World Cup 2023: आयसीसी वर्ल्डकपचे सचिन तेंडुलकरला मिळाले ‘Golden Ticket’, बीसीसीआयने शेअर केला खास फोटो

ऑस्ट्रेलिया तीन वेळा विश्वविजेता बनला –

ग्लेन मॅकग्रा १९९९ क्रिकेट विश्वचषक, २००३ विश्वचषक आणि २००७ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. मॅकग्राने ऑस्ट्रेलियाकडून २५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १२४ कसोटी सामन्यांमध्ये ५६३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा १० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २९ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader