Former Cricketer Herschel Gibbs Engagement at 49 with Girlfriend Dana Nemeth: क्रिकेट जगतात काही मोजक्याच फलंदाजांना एका षटकात सहा षटकार मारता आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने हा पराक्रम सर्वात पहिल्यांदा केला होता. हर्शल गिब्स त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत असायचा, पण वयाच्या ४९ व्या वर्षी हा खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. त्याने आता आपल्या एंगेजमेंटने सर्वांना चकीत केले आहे.
वयाच्या ४९ व्या वर्षी गिब्सने केली एंगेजमेंट-
हर्शल गिब्सने वयाच्या ४९ व्या वर्षी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. गिब्सने गेल्या महिन्यात त्याचा जवळचा मित्र डाना नेमेथशी एंगेजमेंट केली. या जोडप्याने एंगेजमेंटचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गिब्स नेमेथला रोमँटिक प्रपोजल सोबत मनातील गोष्ट सांगितली. फोटोंमध्ये गिब्स आणि नेमेथ खूप आनंदी दिसत होते.
गिब्सचे यापूर्वी झाले आहे लग्न –
हर्शल गिब्सने यापूर्वी २००७ मध्ये लग्न केले होते. त्यांनी सेंट किट्स बेटावरील तेनिली पवईशी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही. दोघांचा लवकरच घटस्फोट झाला. यानंतर गिब्स अनेक वादात राहिले. फिक्सिंगपासून ते मद्यधुंद अवस्थेत फलंदाजीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तो चर्चेत होता.
निवृत्तीनंतर गिब्स बनला प्रशिक्षक –
निवृत्तीनंतर हर्शल गिब्स आता प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याने अनेक टी-२० लीग संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्जचे प्रशिक्षक राहिला आहे. २०१९ मध्ये, तो युरो टी-२० स्लॅममध्ये रॉटरडॅम राइनोजचा प्रशिक्षक होता. त्याच वेळी, त्यांनी लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो किंग्जचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
हेही वाचा – Team India: जसप्रीत बुमराहने पुनरागमनाबद्दल चाहत्यांना दिली आनंदाजी बातमी, पाहा VIDEO
एकदिवसीय सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले –
२००७ च्या एकदिवसीय विश्वचषकात गिब्सने ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. गिब्सने हा एकदिवसीय विक्रम नेदरलँड्सविरुद्ध केला. गिब्सने वेन बंजच्या षटकात सहा चेंडूवर सलग ६ षटकार मारले होते.