ICC WTC Final 2023: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली आहे. यासह जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही संघ पात्र ठरला आहे. त्याचा अंतिम सामना ७ जून २०२३ रोजी ओव्हल येथे होईल. या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद अमीरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. भारताने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर ऑस्ट्रेलिया प्रथमच या जेतेपदाच्या लढाईत सहभागी होणार आहे.

या सामन्याला अजून ३ महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे, पण आतापासूनच अनेक जाणकारांकडून याची चर्चा होत आहे. या एपिसोडमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद अमीरने या सामन्याचा विजेता आधीच घोषित केला आहे. अनुभवी गोलंदाजाच्या मते, ओव्हलवर होणाऱ्या सामन्यात भारताचा वरचष्मा आहे. त्यामुळे ते विजेतेपद मिळवू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: अक्षर पटेलने जसप्रीत बुमराहला टाकले मागे; बॉर्डर-गावसकर मालिकेत केला मोठा विक्रम

भारताकडे जिंकण्याची सर्वोत्तम संधी असेल –

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आमिरला विचारण्यात आले की, ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तुमचा अंदाज काय आहे? यावर आमिरने उत्तर दिले की, ‘मला वाटते भारताकडे जिंकण्याची सर्वोत्तम संधी असेल.’ भारताने मागच्या वेळीही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण तिथे त्यांना विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: अक्षर पटेलने जसप्रीत बुमराहला टाकले मागे; बॉर्डर-गावसकर मालिकेत केला मोठा विक्रम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी विराट कोहलीने शेवटच्या टेस्टमध्ये शतक झळकावले. अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने १८६ धावांची खेळी केली. विराटने स्वतः सांगितले की, हे शतक योग्य वेळी आले आहे. त्यामुळे तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अगदी आरामात खेळू शकेल.

हेही वाचा – IND vs AUS ODI Series: पॅट कमिन्स वनडे मालिकेतून बाहेर; ‘हा’ खेळाडू पाच वर्षांनंतर संघाचे नेतृत्व करणार

भारतीय संघाची ही सलग दुसरी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल आहे. याआधी, संघाने २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्येच अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यावेळी भारत जेव्हा पुन्हा मैदानात उतरेल, तेव्हा विजयाच्या इराद्याने खेळेल. अलीकडेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून संघ मजबूत स्थितीत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer mohammad amir has made a prediction about the title of wtc final ind vs aus 2023 vbm
Show comments