पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची शेवटच्या षटकांमधील खराब कामगिरी ही भारतासाठी “खरी चिंतेची बाब”आहे, असे मत क्रिकेटचे महान खेळाडू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांतील शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्या आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये त्याने १९व्या षटकात १६ धावा दिल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने २०९ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना विजयाची नोंद करण्यात यश मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावसकर यांनी स्पोर्ट्स टुडेच्या मुलाखतीत सांगितले की, “मला वाटत नाही तिथे जास्त दव होते. आम्ही क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाजाना बोटे सुकवण्यासाठी रुमाल वापरताना पाहिले नाही. त्यामुळे हे कारण तर अजिबातच असू शकत नाही. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. उदाहरणार्थ, तिथे १९व्या षटकात ती खरी चिंतेची बाब आहे. ते म्हणाले, “जेव्हा भुवनेश्वर कुमार सारख्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातो तेव्हा विरोधी संघाचा फलंदाज  प्रत्येक वेळी धावा काढत असतो. त्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघाविरुद्धच्या सामन्यांमध्ये १८ चेंडूत ४९ धावा दिल्या आहेत.

हेही वाचा   :  जसप्रीत बुमराहची दुखापत कितपत गंभीर रोहित शर्माने अंतिम अकरामध्ये न घेतल्याने चर्चांना आले उधाण.. 

गावसकर म्हणाले, “जर सरासरी काढायची झाल्यास “एका चेंडूवर जवळपास तीन धावा देणे इथपर्यंत मी समजू शकतो पण त्याही खूप जास्त होतात. त्याच्यासारखा अनुभवी आणि क्षमता असलेल्या गोलंदाजाकडून १८ चेंडूत ३५ ते ३६ धावा दिल्या जात असतील तर ही खरोखरच चिंतेची बाब आहे.” पुढे ते म्हणाले की, “भारताला चांगल्या धावसंख्येचाही बचाव करता आला नाही, परंतु जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी विभागाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली.”

हेही वाचा   :   टी२०त सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणाऱ्या बाबर, विराटला मोहम्मद रिझवान टाकले मागे

बुमराह या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपासून बाहेर आहे. कारण, तो पाठीच्या तीव्र दुखापतीतून बरा होत होता. गावसकर म्हणाले, “आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं आहे की, भारताला गोलंदाजी, फलंदाजी, आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे, चांगल्या धावसंख्येचा बचाव करण्यातही ते सक्षम नाहीत. “कदाचित बुमराह येतो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते कारण तो सलामीवीरांना बाद करतो. काल (मंगळवार) ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केल्याने भारताला यश मिळाले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer sunil gavaskar expressed concern over bhuvneshwars bowling in the last overs avw