Kevin Pietersen met Union Home Minister Amit Shah: सोशल मीडियावर हिंदीमध्ये पोस्ट शेअर करून चर्चेत असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार सध्या भारत दौऱ्यावर आहे. ४२ वर्षीय केविन पीटरसन यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पीटरसनने अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ट्विटर अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोघेही एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. केविन पीटरसनने फोटोसोबत लिहिले की, ‘आज सकाळी अप्रतिम स्वागत केल्याबद्दल अमित शाह यांचे आभार. आकर्षक संभाषण. आपण एक दयाळू, काळजी घेणारी आणि प्रेरणादायी व्यक्ती आहात! धन्यवाद.’
४२ वर्षीय केविन पीटरसननेही भारताच्या आदरातिथ्याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी भारताच्या आदरातिथ्याबद्दल लिहिले की, ‘मी भारतात येण्यासाठी नेहमीच खूप उत्सुक असतो. जगातील सर्वोत्तम आदरातिथ्य असलेला देश मला आवडतो. जगातील माझ्या आवडत्या शहरांपैकी एक असलेल्या दिल्लीत काही दिवस घालवले.’
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर इंग्रजीसह हिंदीतही पोस्ट शेअर करण्यात पटाईत आहे. याआधीही त्यांनी अनेकवेळा हिंदीत पोस्ट करून चर्चेच आला होता.
हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाविरुद्ध नॅथन लायनने रचला इतिहास; मुथय्या मुरलीधरनचा मोडला विक्रम
२००४ मध्ये पदार्पण करणाऱ्या पीटरसनने इंग्लंडकडून १० कसोटी सामन्यांमध्ये ८१८१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर १० विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे १३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४४० धावा आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये जास्त सामने खेळलेले नाहीत. पीटरसनने ३७ टी-२० सामन्यांमध्ये ११७६ धावा करताना एक विकेट घेतली आहे.