इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे आजारपणामुळे वॉल्व्हरहॅम्पटन येथे निधन झाले, अशी माहिती मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) गुरुवारी दिली. ते ८६ वर्षांचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधल्या फळीतील सामर्थ्यशाली फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज हे वैशिष्ट्य जोपासणाऱ्या डेक्स्टर यांनी १९५८ ते १९६८ या कालावधीत ६२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी ४७.८९च्या सरासरीने एकूण ४,५०२ धावा केल्या आणि ६६ बळी मिळवले. यापैकी ३० सामन्यांत डेक्स्टर यांनी देशाचे नेतृत्व केले.

दर्जेदार वेगवान माऱ्यापुढे वर्चस्व गाजवण्याची क्षमता असलेल्या डेक्स्टर यांनी नऊ शतके झळकावली. यातील सहा खेळींमध्ये १४०हून अधिक धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९५६ ते १९६८ या कालावधीत त्यांनी २१ हजारांहून अधिक धावा आणि ४१९ बळी घेतले आहेत. निवृत्तीनंतर डेक्स्टर यांनी वृत्तांकन आणि विश्लेषक म्हणून कार्य केले. तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. वर्षाच्या पूर्वार्धात ‘आयसीसी’ क्रिकेट हॉल ऑफ फ्रेममध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former england captain ted dexter dies akp