इंग्लंड क्रिकेटमध्ये सध्या वर्णद्वेषावरून खळबळ उडाली आहे. यॉर्कशायरचा माजी क्रिकेटपटू अझीम रफिकच्या खुलाशांनी सुरू झालेल्या या वादात आता इंग्लंडच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला क्रिकेटपटूने वर्णद्वेषाशी संबंधित एक अश्लील टिप्पणी पत्र शेअर केले आहे. त्याच वेळी, भारताच्या माजी यष्टीरक्षकाने देखील यासंदर्भात आपले मत दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडची पहिली महिला कृष्णवर्णीय क्रिकेटपटू इबोनी रॅनफोर्ड ब्रेंटनेही वर्णद्वेषावर आपली वेदना व्यक्त केली आहे. तिने सांगितले, ”जेव्हा मी २००१ मध्ये इंग्लंडसाठी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा मला अनेक धमक्या आणि अपमानास्पद पत्र आणि मेल्सचा सामना करावा लागला होता.” त्यापैकी एक इबोनीने शेअर केला आहे, ज्यामध्ये इंग्रजीमध्ये अनेक वाईट गोष्टी लिहिल्या आहेत.

इबोनीने २००१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यावेळी ती एकमेव आणि पहिली कृष्णवर्णीय महिला क्रिकेटपटू होती. ज्यासाठी त्याला अनेक वर्णद्वेषी प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. अझीम रफिकने वर्णद्वेषाविरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवल्यानंतर हा मुद्दा इंग्लंडमध्ये चांगलाच तापला आहे. एकापाठोपाठ एक इतर अनेक देशांतील क्रिकेटपटूंनी याबाबत तक्रारी करायला सुरुवात केली आहे.

याशिवाय भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनियर यांनीही वर्णद्वेषाबाबत मौन सोडले आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले, ”इंग्लंडमध्ये अश्लील वक्तव्यांचा सामना करावा लागला होता. माझ्या समालोचन कारकिर्दीची सुरुवात करताना मला अनेकदा या गोष्टींना सामोरे जावे लागले.”

फ्लेचर रिपोर्ट

डॉ. थॉमस फ्लेचर, ज्यांनी २०१५ मध्ये यॉर्कशायरसाठी आणि २०१४ मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) साठी असे दोन अहवाल तयार केले होते. यात इंग्लंमधील तळागाळातील क्लबमध्ये ब्रिटिश आशियाई लोकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला होता. फ्लेचर हे लीड्स बेकेट युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इव्हेंट्स, टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये वाचक आहेत. त्यांनी क्रिकेट, स्थलांतर आणि डायस्पोरिक समुदायांचे संपादन देखील केले आहे आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि यॉर्कशायर क्रिकेटचे सल्लागार म्हणून काम केले आहे.

हेही वाचा – अखेर ‘त्याची’ प्रतीक्षा संपली! तब्बल १४०० किमी चालत गाठलं होतं रांची; आता धोनीला मिठी मारत म्हणाला…

फ्लेचर हे रफिकच्याच प्रदेशाचे रहिवासी असून बार्नस्ले येथील क्लबसाठी खेळले होते. येथेच १५ वर्षीय रफिकला ड्रेसिंग रूममध्ये इतर खेळाडूंनी जबरदस्तीने धरून त्याच्या तोंडात दारू ओतली होती. २०१४ मध्ये ईसीबीच्या स्वतःच्या संशोधनानुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये १४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या क्रिकेट खेळणाऱ्या अंदाजे ९,०८,००० लोकांपैकी ३० टक्के लोक दक्षिण आशियाई वंशाचे होते. संघातील निवड, स्काउट्स, प्रशिक्षक आणि कोणाची भरती करायची याचा निर्णय घेणाऱ्या लोकांची समस्या आहे.

फ्लेचर यांच्या म्हणण्यानुसार हा मुद्दा फक्त यॉर्कशायर आणि एसेक्स क्लबशी संबंधित नाही. या दोन क्लबव्यतिरिक्त हा संपूर्ण देशाचा मुद्दा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former england cricketer ebony rainford brent revealed about racism adn