लंडन : दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंग्लंडचे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे सोमवारी केंट येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अंडरवूड यांनी अचूक गोलंदाजीच्या जोरावर ६० आणि ७०च्या दशकांत आपला दबदबा राखला होता. अंडरवूड इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी ८६ कसोटींत २९७ गडी बाद केले. तब्बल २४ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या अंडरवूड यांनी या कालावधीत २,४६५ गडी बाद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अंडरवूड यांची आकडेवारी हा एक भाग झाला. मैदानावरील सर्वोत्तम क्षणांमध्ये १९७७ मधील भारताविरुद्धची मालिका विसरता येणार नाही. त्या वेळी पाच सामन्यांच्या मालिकेत अंडरवूड यांनी २९ गडी बाद करताना भारताला ३-१ असे पराभूत केले होते. तेव्हा सर्वोत्तम फलंदाज असलेल्या सुनील गावसकर यांनीही अंडरवूड यांच्या गोलंदाजीचा जणू धसका घेतला होता. तेव्हा चार दशकांपूर्वीच्या इंग्लंडचा आणखी एक धूर्त डावखुरा फिरकी गोलंदाज हेडली व्हेरिटीची आठवण इंग्लंड क्रिकेटला झाली. डग्लस जार्डिनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने १९३३-३४ मध्ये पहिला मालिका विजय मिळवला. तेव्हा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हेडलींनी २४ गडी बाद केले होते. हेडली व्हेरिटींचा हाच वारसा चार दशकांनी अंडरवूड यांनी वेगवान गोलंदाज जॉन लीव्हरच्या साथीत आबाधित ठेवला होता. गोलंदाजीतील अचूकतेमुळे अंडरवूड क्रिकेट वर्तुळात ‘डेडली’ या टोपणनावाने परिचीत होते.
हेही वाचा >>> ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
गावस्कर ऐन भरात असलेल्या काळात अंडरवूड यांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे दाखले आजही दिले जातात. इम्रान खान आणि मायकल होिल्डग या वेगवान गोलंदाजांनी ऐन भरात असताना कसोटीत गावस्कर यांना ११ वेळा बाद केले. पण, अंडरवूडने या सर्वांवर कडी करताना तब्बल १२ वेळा गावस्कर यांना आपली शिकार बनवले. तो कमालीचा झटपट चेंडू टाकायचा. वेगवान गोलंदाज आग ओकत असतानादेखील मला अंडरवूडची गोलंदाजी खेळणे कठीण गेले असे गावस्कर यांनीदेखील मान्य केले होते. अंडरवूड यांनी भारताविरुद्ध खेळताना २० कसोटी ६२ बळी मिळवले. अंडरवूड हे तळातल्या फळीत फलंदाजी करायचे. त्यांची फलंदाजी किरकोळ होती. पण, अनेकदा रात्रप्रहरी (नाइट वॉचमन) म्हणून येताना त्यांनी वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना केल्याची उदाहरणे आहेत. पुढे वादग्रस्त केरी पॅकर्सच्या काळात अंडरवूड यांनी कारकीर्दीमधील दोन वर्षे वाया घालवली. नंतर १९८१ मध्ये बंडखोर इंग्लंड संघासोबत दक्षिण आफ्रिका दौरा केल्याने त्यांच्यावर बंदीदेखील आणण्यात आली होती. निवृत्त झाल्यावर अंडरवूड एक यशस्वी व्यावसायिकही बनले. अर्थात, हा व्यवसायही क्रिकेटचाच होता. त्यांनी कृत्रिम खेळपट्टी (रोल-इन) बनविण्याच्या व्यवसायात चांगला जम बसवला होता. मेरिलिबोन क्रिकेट क्लबचे ते २००८ मध्ये अध्यक्षही राहिले होते. आज क्रिकेट खूप बदलले असले, तरी जुन्या पिढीतल्या क्रिकेटपटू त्यांच्या हातातील जादू कधी विसरणार नाहीत.