फॉर्म्युला वन कार रेसिंगचा स्टार आणि सात वेळा जगज्जेता ठरलेला मायकल शूमाकर स्कीइंग खेळादरम्यान झालेल्या अपघातात जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शुमाकरच्या मेंदूला जबर मार लागल्याने तो कोमात गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. मायकल शुमाकर हा सातवेळा ‘फॉर्म्युला वन’ चा चॅम्पियन राहिलेला आहे.
फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामध्ये स्कीइंग करताना शूमाकरला जबरदस्त अपघात झाला. या अपघातात शूमाकरचे डोके एका खडकावर आदळल्याची माहिती आहे. त्याच्यावर तात्काळ न्यूरोसर्जिकल ऑपरेशन करण्यात येत असल्याचे दक्षिणेतील फ्रेन्च सिटी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा