टीम इंडियाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने सरफराज खानबद्दल असे एक ट्विट केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करूनही सरफराज खानला टीम इंडियामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. १७ जानेवारी रोजी रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीविरुद्ध मुंबईच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी सरफराजने १२५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कठीण परिस्थितीत सरफराजची ही खेळी मुंबईसाठी खूप महत्त्वाची ठरली. सर्फराजच्या या खेळीच्या जोरावर मुंबई संघाला २९३ धावांपर्यंत मजल मारता आली. अलीकडेच, बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सरफराजचा संघात समावेश होऊ शकतो, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. सरफराजची टीम इंडियात निवड न झाल्याबद्दल व्यंकटेश प्रसाद यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: मालिका सुरू होण्यापूर्वी टॉम लॅथमने सांगितली आपल्या संघाची सर्वात मोठी कमजोरी; म्हणाला, ‘आम्हाला…’

सरफराजच्या शतकाचा व्हिडिओ शेअर करताना व्यंकटेश प्रसाद यांनी लिहिले की, ”सलग तीन ब्लॉकबस्टर देशांतर्गत हंगाम असूनही सरफराज खान भारतीय कसोटी संघात नसणे केवळ त्याच्यावर अन्यायच नाही, तर देशांतर्गत क्रिकेटसाठी एक शिवी आहे. या व्यासपीठाला काहीच अर्थ नाही असे दिसते. या धावा करण्यासाठी तो तंदुरुस्त आहे. जर वजनाचा प्रश्न असेल तर या वजनाचे इतर अनेक खेळाडू आहेत.”

मुंबईकडून सरफराज खानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १५५ चेंडूत १६ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १२५ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा आकडाही गाठता आला नाही. पृथ्वी शॉने ४० धावा केल्या, तो मुंबईसाठी दुसरा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former fast bowler venkatesh prasad furious over sarfaraz khans non selection said this is abusing domestic cricket vbm